बॅंक ऑफ महाराष्ट्रची सव्वा कोटीची फसवणूक : 11 गावातील 49 जणांवर गुन्हा
मेढा | कुडाळ (ता. जावळी) येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेची अंदाजे सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कुडाळ, आखाडे, आंबेघर, हुमगाव, बेलोशी, रानगेघर, सनपाने, सरताळे, सोमर्डी, वहागाव, इंदवली अशा विविध 11 गावांतील 49 जणांवर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत बँक ऑफ महाराष्ट्र कुडाळ शाखेचे शाखाधिकारी सरोजकुमार गणेश भगत यांनी मेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या कुडाळ शाखेत बनावट सातबारे सादर करून त्यावर तलाठ्यांच्या खोट्या सह्या, शिक्के घेत काही खातेदारांनी 2014 मध्ये कर्ज घेतले. मात्र, या कर्जाची परतफेड केलीच नाही. यामध्ये 49 जणांनी संगनमताने खोटे सातबारे सादर करत अंदाजे सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे बँकेच्या निदर्शनात आहे. त्यावर शाखाधिकारी श्री. भगत यांनी मेढा कोर्टात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मेढा कोर्टाने या 49 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश मेढा पोलिसांना दिले होते. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांनी 2014 ते 2023 या कालावधीत ही फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मेढा सपोनि संतोष तासगावकर तपास करत आहेत.
गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे व गावे पुढीलप्रमाणे
बँक ऑफ महाराष्ट्रची फसवणूक केल्याप्रकरणी सचिन उत्तमराव शिंदे, विक्रांत बापूसाहेब शिंदे, बाळासाहेब जगन्नाथ अमराळे, सचिन लक्ष्मण जाधव, सचिन बापूसाहेब शिंदे, लक्ष्मण शहाबाद(सर्व रा. आखाडे) प्रवीण शिवाजी यादव (रा. आंबेघर) कांता चंद्रकांत बेलोसे (रा. बेलोशी), महादेव मदने, आदिनाथ लोहार, संगम जरे, छाया दीपक जाधव (सर्व रा. हुमगाव), संतोष शिवाजी पवार, संतोष बाळासाहेब कदम, सयाजी बाळासाहेब कदम, जयश्री सयाजी कदम (सर्व रा. कुडाळ), शिवाजी शंकर करंजकर, श्रीराम शंकर करंजकर, मच्छिंद्र शंकर बनकर (सर्व रा. रानगेघर), अक्षय भाऊसो दुर्गावळे, दिगंबर विठ्ठल गोळे, लिला विजय दुर्गावळे, अक्षय अशोक पवार (सर्व रा. सनपाने), विकास तानाजी नवले, भारती तानाजी नवले, वैभव तानाजी नवले, तानाजी आनंदराव नवले, संताजी दत्तात्रय नवले (सर्व रा. सरताळे), जितेंद्र यशवंत मेंगळे, नितीन यशवंत मेंगळे, (रा. शेते), प्रवीण शामराव परामने सोमर्डी, नवनाथ जगन्नाथ रांजणे वहागाव, सुधीर बबन यादव आंबेघर, अविनाश गायकवाड इंदवली या 49 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.