कराड उत्तरसाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून 1 कोटी 26 लाखांचा निधी : निवासराव थोरात
कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांच्या पाठपुराव्याला यश
कराड | माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कराड उत्तरसाठी केलेल्या मागणीनुसार कराड उत्तर मधील गावांसाठी 1 कोटी 26 लाख रुपयांचा निधी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. 2515 इतर ग्रामीण विकास कार्यक्रम व जनसुविधा अंतर्गत हा निधी मंजूर झाला असून कराड तालुक्यातील कराड दक्षिण व कराड उत्तर विभागातील जवळपास 53 गावांसाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला असल्याची माहिती कराड उत्तरचे काॅंग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांनी सांगितले.
या निधीच्या माध्यमातून पाडळी (ता. कराड) येथील गणेश मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणेसाठी रु. 15 लाख, कामथी येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 10 लाख, वाघेरी येथील ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती करणेसाठी रु. 3 लाख, चिखली येथील चिखली-निगडी रस्ता चौक ते श्री जोतिबा मंदिर पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त गटर करणेसाठी रु. 10 लाख, जुने कवठे येथीलजोतिबा मंदिरासमोर सभामंडप बांधणेसाठी रु. 10 लाख, निगडी येथील जि. प. प्राथमिक शाळा ते राम मंदिर पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 10 लाख, तळबीड येथील रावळ रोड ते नंदकूमार मोहिते खडीपर्यंत जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 10 लाख, नवीन कवठे, येथील विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यास संरक्षण भिंत बांधणेसाठी रु. 10 लाख, नडशी येथील मारुती मंदिरा समोर सभामंडप बांधणेसाठी रु. 15 लाख, कोर्टी येथे दत्त मंदिर परिसरामध्ये सुशोभिकरण करणेसाठी रु. 10 लाख, तासवडे येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त गटर करणे रु. 10 लाख तसेच जनसुविधा मधून नडशी येथे ग्रामपंचायत कार्यालय ते अमोल थोरात घर रस्ता काँक्रीट करणे 8 लाख रु, पार्ले येथे ग्रामपंचायत कार्यालय विस्तार करणे व सुशोभीकरण करणे 5 लाख रु असा कराड उत्तर मधील गावांसाठी एकूण 1 कोटी 26 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून विविध विकासकामे केली जाणार आहेत.
आ. पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून जास्तीत- जास्त निधी आणणार : निवासराव थोरात
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या माध्यमातून 1 कोटी 26 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मा. बाबांनी मुख्यमंत्री असताना कोट्यावधी रुपयांचा निधी कराड उत्तर साठी देऊन अनेक प्रश्न मार्गी लावले होते. यापुढेही पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी कराड उत्तरला आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांनी सांगितले.