रेठरे बुद्रुकसाठी 1 कोटी : डाॅ. सुरेश भोसलेंच्या हस्ते भूमिपूजन

कराड | संथ वाहणारी कृष्णा नदी, नैसर्गिक सौंदर्य लाभलेला परिसर आणि गावातील मंदिरांच्या देखण्या वास्तू असा वैविध्याने नटलेला परिसर लाभणे हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. कृष्णानदीच्या काठी संरक्षण भिंतीचे काम होत असताना, रेठरे बुद्रुकच्या पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील सुकन्या राज्यसभेच्या माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या विशेष फंडातून नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती घाट व पायऱ्या बांधकामासाठी तब्बल १ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या कामाच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी युवा नेते आदित्य मोहिते, सरपंच हणमंत सूर्यवंशी, उपसरपंच भाग्यश्री पवार, सोसायटीचे चेअरमन व्ही. के. मोहिते, माजी जि. प. सदस्य शामबाला घोडके, माजी सरपंच सुवर्णा कापूरकर, बबन दमामे, माजी उपसरंपच शिवाजीराव दमामे, सुनिल पवार, जयवंतराव साळुंखे, राजीव मोहिते, बाळासाहेब मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी हणमंत सूर्यवंशी, व्ही. के. मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संजय पवार, आबा मोहिते, बापूराव मोहिते, राहुल मोहिते, एम. के. मोहिते, विलास धर्मे, संजीवनी कार्वेकर, मंथन शेवाळे यांच्यासह ग्रा. पं. व सोसायटी सदस्य, ग्रामस्थ, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. संतोष मोहिते यांनी आभार मानले.