ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यविधानसभा 2024शैक्षणिकसातारा

काले येथील महात्मा गांधी विद्यालयास 1 कोटी : शरद पवार

दोन महिन्यात राज्यात सत्ता परिवर्तनाचे संकेत

कराड ः- राज्यात आपलं सरकार सत्तेत असताना तत्कालिन अर्थमंत्री अजित पवार यांनी माझा सल्ला ऐकून रयत शिक्षण संस्थेसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये केली होती. त्यापैकी तीन कोटी रुपये संस्थेला मिळाले आहेत. ऊर्वरीत दोन कोटी मिळायचे आहेत. आता दोन महिन्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत येईल. त्यानंतर आपण ते दोन कोटी रुपये आणू, अशी ग्वाही खासदार शरद पवार यांनी दिली. यावेळी शरद पवार यांनी काले येथील महात्मा गांधी विद्यालयास 1 कोटी रूपये जाहीर केले.

काले (ता. कराड) येथे रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन रविवारी खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संघटक डॉ. अनिल पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार विश्वजित कदम, माजी आमदार शशिकांत शिंदे, विकास देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

तरूणाने अन् दाढी काढली
काले गावचा विकास पाटील या तरूणाने बारा वर्षापूर्वी एक निश्चय (संकल्प) केला होता. जोपर्यंत काले येथील महात्मा गांधी विद्यालयाची इमारत पूर्ण करत नाही, तोपर्यंत पूर्ण दाढी काढणार नाही. तब्बल बारा वर्षांनी इमारत पूर्ण झाली. खा. शरद पवार यांनी विकास पाटील यांना स्टेजवरून केलेला संकल्प पूर्ण झाला आता दाढी काढा असे सांगितले. यावेळी विकास पाटील यांनी आपल्या या कामात सोबत असलेला पत्रकार मित्र संतोष गुरव कोरोना काळात गमावला असल्याची आठवणही सांगितली. या संकल्पपूर्तीसह सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार विकास पाटील याने स्टेजवर नतमस्तक मानले. शरद पवार यांच्या सल्ल्यानंतर रात्री विकास पाटील यांनी आपली पूर्ण दाढी काढली.

सव्वादोन कोटींची इमारत उभी
काले येथील शाळेच्या नूतन इमारतीसाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने सुमारे १ कोटी रुपयांचा निधी शरद पवार यांनी दिला आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेकडून ५५ लाख, सदुगुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड यांच्याकडून २० लाख, रयत शिक्षण संस्थेचे व महात्मा गांधी विद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी, रयत सेवक, शिक्षक, हितचिंतक व शालेय बाल गोपाळांनी दिलेले आपल्या वाढदिवसाचे व खाऊचे पैसे असे मिळून सुमारे ७२ लाखाचा निधी शाळेच्या इमारतीसाठी दिला आहे. तसेच या सर्व निधीतून सुमारे 2 कोटी 25 लाख रुपयांची शाळेची इमारत उभारण्यात आली.

शरद पवार अन् पाऊस…
साताऱ्यात गतवेळी लोकसभेसाठी पोट निवडणूक लागली असताना उदयनराजे यांच्याविरोधात शरद पवार यांचे जुने मित्र श्रीनिवास पाटील रिंगणात होते. त्यावेळी झालेल्या सभेत शरद पवार यांनी भरपावसात भाषण केले. ते भाषण चर्चेचा विषय ठरले. रविवारी त्याची पुनरावृत्ती झाली. काले येथे विद्यालयाच्या इमारत उद्घाटनावेळी शरद पवार यांचे भाषण सुरू असताना जोरदार पाऊस सुरू झाला. अन् उपस्थितांना साताऱ्यातील ‘ती’ सभा आठवली.

Sharad Pawar and Vikas Patil in Kale village

काले : येथे महात्मा गांधी विद्यालयाच्या नुतन इमारत उद्घाटनप्रसंगी खासदार शरद पवार यांना माहिती देताना विकास पाटील.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker