कराड- तासगाव मार्गावर ट्रक्टर- दुचाकी अपघातात 1 युवक ठार, 1 गंभीर जखमी
कराड | कराड- तासगाव मार्गावर वडगाव हवेली येथे डिझेल संपलेल्या उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून दुचाकीने धडक दिली. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड- तासगाव मार्गावर वडगाव हवेली येथे महात्मा गांधी विद्यालयासमोर डिझेल संपल्यामुळे उभा असलेला ट्रॅक्टर ट्रेलरला (महिंद्रा 575 क्र. MH- 11- BA- 1194) ला पाठीमागून स्प्लेंडर दुचाकीची (क्र. MH- 50- 3764) ने धडक दिली.
या अपघातात दुचाकी चालक रोहिदास उर्फ किरण माणिक गोडसे (वय- 31, रा. भवानीनगर, ता. वाळवा, जि. सांगली) हा युवक जागीच ठार झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला सदानंद आप्पासो शिंगाडे (वय- 25, रा. शेरे, ता. कराड) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्याच झालेली आहे.