क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

कराड पोलिसांची कारवाई : ड्रग्ज प्रकरणात 12 जणांना अटक

दोन परदेशी नागरिकांचा समावेश

कराड :- ड्रग्जच्या तस्करीप्रकरणी पोलिसांनी आजअखेर अटक केलेल्या बाराजणांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ड्रग्ज प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत असून यामधील संशयीतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणात दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत अमित घरत (रा. करांजडे, ता. पनवेल), दीपक सुर्यवंशी (रा. चाळीसगाव, जि. जळगाव), बेंजामिन अँना कोरू ( अफ्रिकन खंड), रोहित शहा (रा. शनिवार पेठ, कराड), सागना इमॅन्युअल (सेनेगल देश), नयन मागाडे (रा. डोंबिवली पूर्व, जि. ठाणे), प्रसाद देवरुखकर (रा. पावस्कर गल्ली, कराड), संतोष दोडमणी (रा. सैदापूर), फैज मोमीन (रा. मार्केट यार्ड, कराड), राहुल बडे (रा. सोमवार पेठ, कराड), समीर उर्फ सॅम शेख (रा. आदर्श कॉलनी, कार्वे नाका, कराड), तौसीब बारगिर (रा. कार्वेनाका, कराड) अशी अटकेत असलेल्या संशयीतांची नावे आहेत.

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, संतोष सपाटे, संताजी जाधव, असिफ जमादार, प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक बाबर, मयुर देशमुख, अनिकेत पवार, वैभव पवार, संग्राम भुताळे, राजाराम बाबर तसेच कराड शहर पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, सपोनि राजेश माळी, अशोक भापकर, निलेश तारु, पोउनि साक्षात्कार पाटील, सतिश आंदेलवार, दिपक बागवे, पोलीस अंमलदार अनिल स्वामी, संग्राम पाटील, उंब्रज पोलीस ठाणेकडील सपोनि रविंद्र भोरे, अंमलदार मयुर थोरात, सागर बर्गे, पोलीस ठाणेचे महेश पवार, यशवंत घाडगे, प्रशांत मोरे, ओमकार डुबल, रामदास भास्करवाड, रणजित कुंभार, रेश्मा तांबोळी यांनी सहभाग घेतला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker