सातारा जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी 14 किलोमीटरचा बोगदा तयार : आ. जयकुमार गोरे म्हणाले….
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
मी आमदार असताना जे- जे सरकार होत, त्यांनी मदत केली. काही ठिकाणी संघर्ष करून मदत आणावी लागली. ती मदत मिळात असताना काम सुरू राहिल यांची काळजी घेतली. आज जो 14 किलोमीटरचा टनेल पूर्ण झाला, त्याच्यापेक्षा वेगळा आनंद असूच शकत नाही, असे आ. जयकुमार गोरे म्हणाले. जिहे- कटापूर योजनेच्या 14 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या कामाची आ. जयकुमार गोरे यांनी शासकीय अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आ. गोरे म्हणाले, जिहे- कठापूरच्या योजनेच्या 14 किलोमीटर लांबीच्या टनेलचे काम पूर्णत्वाला गेले. या टनेलमधून माण- खटाव मधील किमान 60 गावांना पाणी जाईल. गेल्या 22-25 वर्षापासून मान्यता असणारी ही योजना केवळ मंजूर झाली आणि तशीच राहिली होती. लोकांनी मला आमदार केलं तेव्हा लोकांना खूप अपेक्षा होत्या. मी लोकांना स्वप्न दाखवली. त्या गोष्टीसाठी मी गेल्या 14 वर्षापासून झपाटल्यासारख काम करतोय. साधारण 287 कोटीची योजना जवळजवळ 2500 कोटी चाललेली आहे. यामध्ये वाढीव काम करतोय, यामध्ये नेरमधून दोन तर आंधळीमधून एक उपसा सिंचन योजनेचे काम चालू आहे. नव्याने सव्वा टीएमसी पाणी योजना असून त्याचं काम पुढ जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना या भागात यायचे होते. आता आमचीही भावना आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या योजनेत प्रचंड मोठ योगदान आहे. त्या लोकांच्या हातून पाण्याचे पूजन व्हावे, अशी माझी इच्छा आहे. पाणी पूजन राजकीय हेतून नव्हे तर उर्वरित कामाला लागेल ती मदत होत असते. त्यामुळे यामध्ये स्वार्थही आणि ज्यांनी योगदान दिले त्याबद्दल कृतज्ञता आहे, असे आ. गोरे म्हणाले.
माण- खटावमधील 35 हजार एकर क्षेत्र अोलिताखाली येणार
खटाव- माणचा दुष्काळ हटेल अन् शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहचेल. आता पाणी सोडायचा आवकाश आहे, माण नदीत जाईल, तेथून आंधळी धरणात आणि तेथून शेतकऱ्यांच्या शेतात पोहचेल. या योजनेसाठी अधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत केली. सरकारच्या अडचणी, मंत्र्याच्या अडचणी त्यासोबत कोणाच इंटरेस्ट असेल तर त्याला अधिकाऱ्यांनी बाजूला ठेवून काम केल. या बोगद्यातून सव्वातीन टीएमसी पाणी जाणार असल्याने साडेचार हजार हेक्टर जमिनीचे क्षेत्र अोलिताखाली येणार आहे. नव्याने 1.13 टीएमसी पाणी घेतले आहे, त्यामध्ये 2 ते अडीच हजार हेक्टर क्षेत्र अोलिताखाली येईल. साधारण 30 ते 35 हजार एकर क्षेत्र अोलिताखाली येवून येतील दुष्काळ कायमचा मिटणार असल्याचे आ. गोरे म्हणाले.