धक्कादायक : गाैतमी पाटीलचा ‘तो’ आक्षेपार्ह व्हिडिओ साताऱ्यातून व्हायरल

सातारा | गौतमी पाटीलचा काही महिन्यांपूर्वी कपडे बदलतानाचा व्हिडिओ सातारा जिल्ह्यातूनच व्हायरल केल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यामध्ये सातारा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलास दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गौतमी पाटीलचे बनावट फेसबुक अकाउंट काढून साथीदारासोबत हा व्हिडिओ व्हायरल केल्याचे तपासात समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलासह आयुष अमृत कणसे (वय- 21, रा. भरतगाववाडी, ता. सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, दोन महिन्यांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात गौतमी पाटील हिच्याबाबत सोशल मीडियावर एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. सदरील व्हिडिओ साताऱ्यातील यवत परिसरातील एका कार्यक्रमादरम्यान काढल्याचे तपासात समोर आले आहे. याबाबत विमानळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाकडून संशयितांचा शोध घेतला जात होता. तांत्रिक तपासानुसार पोलिस नगर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलांपर्यंत पोचले. चौकशीत सातारा तालुक्यातील अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे समोर आले.
संबंधित मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी तिच्याच नावाने बनावट अकाउंट काढून कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्याचे तपासात समोर आले. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विलास सोंडे, सहायक फौजदार अविनाश शेवाळे, पोलिस अंमलदार किरण खुडे, रेहान पठाण, अंकुश जोगदंड, दादासाहेब बर्डे, आस्मा शेख, रेणुका भोगावडे, प्रियंका शिंदे हे या कारवाईत सहभागी होते.