उत्तर महाराष्ट्रकोकणक्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामुंबईराजकियराज्यविदर्भ

समृध्दी मार्गावर 26 जण होरपळले : डिझेलचा टॅक फुटल्याने बसला आग

Brilliant Academy

बुलढाणा | विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूर-पुणे एसी स्लीपर कोच बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्यामुळे 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर आठ प्रवासी थोडक्यात बचावले. बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) सुनिल कडासने यांनी अपघात कसा झाला, याची माहिती दिली.

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसच्या बसला समृद्धी महामार्गावर मध्यरात्री 1 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास अपघात झाला. पोलला टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला, किंवा ड्रायव्हर सांगतोय, बसचे टायर फुटले. त्यानंतर गाडी पुलाला लागून घसरली, डिझेल टँक फुटून आग लागली. सगळे झोपेत होते, त्यामुळे 25 जणांचा मृत्यू झाला. केवळ सात-आठ जणांना बसमधून बाहेर येण्याची संधी मिळाली. बसमध्ये तीन लहान मुलं असल्याची माहिती आहे. मृतांची ओळख पटवून नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचं आव्हान आहे, असं पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांनी सांगितलं.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आग विझवली. मृत प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाने केले. पहाटे पाच वाजताच्या सुमारास बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासनेही घटनास्थळी पोहोचले. सध्या पाच ते सहा रुग्णवाहिका, सिंदखेड राजा, किनगाव राजा तसेच नजीकच्या पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बसमधील प्रवाशांचे मृतदेह जळून राख झाले आहेत. त्यामुळे कोणाची ओळख पटवणे कठीण झाले आहे. डीएनए चाचणीबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांशी चर्चा झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker