सातारा जिल्ह्यातील तीन तालुक्यातून 26 जण हद्दपार

सातारा | गणेश उत्सव काळामध्ये सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 26 गुन्हेगारांवर हददपारीची कारवाई करण्यात आली आहे. दि. 27 ते दि. 29 या काळासाठी हा आदेश लागू असणार असल्याचे आदेश म्हटले आहे. या आदेशाप्रमाणे नागेवाडी (एकजण), तासगाव (दोनजण), देगाव (दोनजण), मालगाव (दोनजण), कोंडवे (एकजण), लिंब (तीनजण), कोंडवली (एकजण), माळ्याचीवाडी (एकजण), कण्हेर (एकजण), साबळेवाडी- नुने (एकजण), परळी (तीनजण), कळंबे (एकजण), नागेवाडी (दोनजण), लिंब (एकजण), शेंद्रे (दोनजण) आणि तासगाव येथील एक असा 26 जणांचा समावेश आहे.
पोलीस अधिक्षक सातारा समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना तालुका पोलीस ठाणे हददीतील सराईत गुन्हेगार यांचेवर हददपारीची कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पो. हवा कुंभार व.नं 198, पो.ना. नारनवर ब.नं. 114, सातारा तालुका पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनीक गणेश उत्सव कालावधीत सार्वजनीक शांततेला भंग तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचविणाऱ्या एकूण 26 गुन्हेगारावर कारवाई करण्यात आली.
सार्वजनीक गणेशउत्सव कालावधीमध्ये शांतता राहावी यासाठी त्याचे विरुध्द कार्यकारी दंडाधिकारी सातारा यांचेकडे हददपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास कार्यकारी दंडाधिकारी सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाणे हददीतील एकुन 26 गुन्हेगारांवर दि.27/9/2023 चे 12 वा ते दि.29/9/2023 रोजीचे सकाळी 12 वा पर्यंत या कालावधी करीता सातारा, कोरेगाव, जावली तालुका क्षेत्रामधुन हददपारीचा आदेश देण्यात आला आहे.