पाटण तालुक्यात 3. 4 रिश्टेर स्केलचा भूकंपाचा धक्का : केंद्रबिंदू चांदोली धरण परिसरात
पाटण | सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह लगतच्या गावांमध्ये सकाळी पाऊणेसात वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला आहे. सकाळी झालेला हा भूकंप 3.4 रिश्टेल स्केलचा होता. या भूकंपाच्या धक्यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही, तसेच धरण सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आले. चांदोली धरणाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रातील मोठे धरण असलेल्या कोयना धरणापासून 20 किलोमीटर अतंरावर चांदोली धरण परिसरात आज सकाळी 6.40 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. मॉर्निग वाॅकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये या धक्क्यामुळे भीतीचे वातावरण होते. परंतु, या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
आज सकाळी झालेल्या या भूकंपामुळे सातारा व सांगली जिल्ह्यातील लोकांच्यात चर्चेचा विषय बनला आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने आणि धरण परिसरात भूकंप झाल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे. मात्र, दोन्ही धरणांना कोणताही धोका नसल्याचेही सांगण्यात आले असून सुरक्षित आहेत.