कराड तालुक्यात 4 हजार कुणबी नोंदी : गावनिहाय यादी पहा…
कराड | कराड तालुक्यात कुणबी नोंदी शोधण्याचे काम महसूल विभागाकडून युध्दपातळीवर सुरू असून गेल्या 13 दिवसात 3 हजार 943 इतक्या सापडल्या असून आतापर्यंत 3 लाख 13 हजार 912 नोंदी तपासल्या आहेत. यासाठी कराड महसूलचे कोतवाल 16 कर्मचारी काम करत आहेत. कराड तालुक्यात सवादे गावात 635 तर मसूरला 611 याठिकाणी आतापर्यंत सर्वात जास्त नोंदी सापडल्या आहेत.
कराड तालुक्यातील गावात सापडलेल्या नोंदी पुढीलप्रमाणे ः- म्होप्रे- 20, टाळगाव- 111, जखिणवाडी- 151, निगडी- 144, रिसवड- 63, चिखली- 15, नांदगाव- 22, तारूख- 105, तुळसण- 111, शेरे- 135, कुसूर- 15, कोळेवाडी- 22, आटके- 4, चचेगांव- 12,अोंड- 7, शेणोली- 7, गोळेश्वर- 2, उंब्रज- 236, वडगांव हवेली- 14, रेठरे बु- 25, बेलवडे हवेली- 38, येणपे- 300, खुबी- 23, वारूंजी- 109, कराड- 353, सवादे- 635, शिरगांव- 3, वडगांव उंब्रज- 2, म्हासोली- 347, उंडाळे- 1, घोगाव- 18, कोरिवळे- 15, इंदोली- 11, मरळी- 52, हिंगनोळे- 3, वानरवाडी- 1, खोडशी- 6, गोवारे- 23, कोळे- 8, कालवडे- 21, हेळगांव- 1, वाठार- 23, वसंतगड- 1, सुपने- 11, पाल- 1, मसूर- 611.
कुणबी नोंदी शोधण्याचे काम महसूल विभागाकडून रेकाॅर्ड रूम येथे सुरू असून अजून काही दिवस ते चालणार आहे. या नोंदी शोधण्यासाठी कोतवाल आणि जिल्हा परिषदेचे शिक्षकही जन्म दाखले तपासत आहेत. त्याबरोबर मोडी लिपी तपासल्या जात आहेत. अजूनही काही दिवस कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू असणार असून सध्या 9 नोंव्हेंबर ते 22 नोंव्हेंबर या दरम्यान 4 हजार नोंदी आढळून आल्या आहेत. कराड तालुक्यातील तांबवे, काले, साकुर्डी, विंग या मोठ्या गावात आतापर्यंत एकही नोंद आढळली नाही.