कराड व पाटण तालुक्यातील 14 रस्त्यांसाठी 5 कोटी 35 लाखांचा निधी मंजूर

कराड | पाटण विधानसभा मतदारसंघातील कराड व पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या गावांचे पोहोच असलेले ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग हे अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झाल्याने या रस्त्यांचे दुरुस्तीसाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा वार्षिक आराखड्यांतर्गत निधी मंजूर होण्यासाठी निधीची शिफारशी केल्या होत्या. त्या शिफारशीनुसार पाटण विधानसभा मतदारसंघांतील 12 ग्रामीण रस्त्यांचे कामांसाठी 3 कोटी 35 लक्ष तर इतर जिल्हा मार्गासाठी 2 कोटी असा 5 कोटी 35 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील 3054 ग्रामीण मार्ग दुरुस्ती अंतर्गत मालोशी पाडेकरवाडी रस्ता ग्रामा 3 रस्ता सुधारणा 30 लक्ष, डेरवण हरीजनवस्ती भैरेवाडी रस्ता ग्रामा 129 सुधारणा 30 लक्ष, केळोली बाटेवाडी पाठवडे ग्रामा 115 रस्ता सुधारणा 30 लक्ष, दुसाळे चव्हाणवाडी रस्ता ग्रामा 44 सुधारणा 30 लक्ष, जाधववाडी जोडरस्ता (चाफळ)ग्रामा 127 सुधारणा 30 लक्ष, सोनाईचीवाडी रस्ता ग्रामा 138 रस्ता सुधारणा 30 लक्ष, शिरळ काजारवाडी जोडरस्ता ग्रामा 172 रस्ता सुधारणा 30 लक्ष, मत्रेवाडी ग्रामा 314 रस्ता सुधारणा 30 लक्ष, शितपवाडी ग्रामा 293 रस्ता सुधारणा 30 लक्ष, जंगलवाडी चाफळ जोडरस्ता ग्रामा 126 सुधारणा 20 लक्ष, मोगरवाडी कोंजवडे रस्ता ग्रामा 27 सुधारणा 15 लक्ष मंजूर झाले आहेत.
तसेच तांबवे- भोळेवाडी -आरेवाडी- गमेवाडी- पाठरवाडी रस्ता ग्रामा 147 खडीकरण डांबरीकरण करणे भाग सटावाई ते बोरिंग गमेवाडी 30 लक्ष रूपये मंजूर झाले आहेत. एकूण 12 ग्रामीण मार्गांचे दुरुस्तीसाठी 03 कोटी 35 लक्ष तर 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती अंतर्गत काठीटेक चाफोली- दिवशी खुर्द- चिटेघर- केर रस्ता इजिमा 133 सुधारणा 02 कोटी या प्रमाणे पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती अंतर्गत 13 कामांना 05 कोटी 35 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरील रस्त्यांच्या कामांचा निविदा प्रक्रिया तातडीने करण्याच्या सूचना जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना केल्या असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पावसाळा संपताच या कामांना तातडीने सुरुवात करण्याच्या सूचनाही शंभूराज देसाई यांनी अधिका-यांना केल्या आहेत.