मनोज दादांच्या प्रयत्नातून कराड उत्तर मधील विकास कामांना 60. 59 कोटी निधी
कराड | कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील विकास कामांसाठी 60. 59 कोटी निधी प्राप्त झाला आहे. निधीसाठी कराड उत्तर भारतीय जनता पार्टीचे नेते मनोजदादा घोरपडे यांनी वेळोवेळी वरीष्ठांशी पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हाअध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निधी उपलब्ध झाला आहे.
मतदार संघातील रस्ते व इतर सुविधांसाठी 60. 59 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यामुळे कराड उत्तर भारतीय जनता पार्टीचे नेते मनोजदादा घोरपडे यांचे मतदार संघातील कार्यकर्त्यांनी मनोजदादा यांचे प्रत्यक्ष भेटुन अभिनंदन केले.
यामध्ये प्रामुख्याने बोरगाव- नांदगाव- तारगाव रस्ता, निसराळे- जावळवाडी- नांदगाव- तारगाव रस्ता, इंदोली- चोरे- मरळी- पाली रस्ता, अंतवडी अर्पोच रस्ता, धावरवाडी पाल रस्ता, मसुर रेल्वे स्टेशन ते कोनेगाव रस्ता, तासवड ते कराड रस्ता, पाल ते अतीत रस्ता, चोरजवाडी ते साखरवाडी रस्ता, पाडळी ते गायकवाडवाडी रस्ता, तारगाव ते बोरबन रस्ता, पिंपळी ते सुरली रस्ता, साप ते वेळु रस्ता आदी कामांचा समावेश आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघ हा चार तालुक्यांमध्ये विभागला असुन प्रत्येक तालुक्याला समान निधी मिळाला आहे. पुढील कालावधीमध्ये प्रत्येक गावांमध्ये मागणीनुसार निधी उपलब्ध करणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. कराड उत्तर मतदार संघामध्ये पक्षाचे आमदार नसताना सुद्धा चांगल्या प्रकारचा निधी देऊन 2024 ला कराड उत्तर मध्ये परीवर्तन घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. याप्रसंगी सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तात्या पाटील, रहिमतपुर नगरीचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने काका, शशिकांत गवळी, तानाजी घाडगे, बबन माने, तुकाराम नलवडे, सोमनाथ निकम, अधिक सावकार, विठ्ठल काकडे, वैभव चव्हाण, प्रशांत भोसले, सुनिल दळवी, रमेश कदम, राजेंद्र घाडगे, विक्रम बागल, सोमनाथ सुतार, बाळासो पाटील, निलेश निकम आदी मान्यवर उपस्थित होते.