ताज्या बातम्यापर्यटनपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसाताराहवामान

जिल्ह्यात पावसाची पुन्हा दडी : कोयना धरणात 70.74 TMC पाणीसाठा

– विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्ह्यात पावसाने पुन्हा दडी मारली असून कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली आहे. गेल्या 24 तासात 1.41 टीएमसी पाणीसाठा वाढला असून सध्या धरणात 70.74 टीएमसी पाणीसाठा आहे. सातारा जिल्ह्यात पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्यात चिंतेचे वातावरण पहायला मिळत आहे. तर पूर्वेकडील माण- खटाव, कोरेगाव व फलटण तालुक्यात अनेक ठिकाणी अजूनही पाऊस नसल्याने काही ठिकाणी टॅंकर सुरू आहेत.

कोयनेत 70. 74 टीएमसी पाणीसाठा…
कोयना धरणात रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 70.74 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासात कोयनेला- 37 मिलीमीटर, नवजा- 82 मिलीमीटर व महाबळेश्वरला- 85 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला- 2666, नवजा- 3783 आणि महाबळेश्वरला- 3551 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणात प्रतिसेंकद 18 हजार 343 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे.कोयना धरणातून 2100 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

प्रशासन सज्ज, रेस्क्यू टिमला आपत्कालीन साहित्यांचे वाटप
जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थीतीशी मुकाबला करण्याकरिता जिल्हा प्रशासन सज्ज असून आपत्कालीन परिस्थीती हाताळण्याकरिता प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाच्या समन्वयातून जिल्ह्यातील रेस्क्यू टिम सतर्क ठेवण्यात आले असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन याठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत जिल्ह्यातील रेस्क्यू टिम यांना आपत्कालीन साहित्यांचे वाटपप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, शिरवळ सरपंच रविराज दुधगावकर, जिल्ह्यातील रेस्क्यू टिम सदस्य उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker