कोयनेत 74.22 TMC पाणीसाठा तर धोम, कोयनेतून पाणी सोडले
– विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असून हवामानात झालेल्या बदलामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक प्रतिसेंकद 24 हजार 201 क्युसेस अशी सुरू आहे. धरणात सध्या 74.22 टीएमसी पाणीसाठा आहे. सातारा जिल्ह्यात कोयना धरण परिसरात लावलेल्या हजेरीने धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या आशा पल्लवित राहिलेल्या आहेत.
कोयनेत 74. 22 टीएमसी पाणीसाठा…
कोयना धरणात मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 74.22 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासात कोयनेला- 97 मिलीमीटर, नवजा- 163 मिलीमीटर व महाबळेश्वरला- 124 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला- 2827, नवजा- 4051 आणि महाबळेश्वरला- 3757 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणातून 2100 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
धोम धरणातून पाणी सोडले, नदीकाठी इशारा
धोम धरणाची पाणी पातळी 743.85 मी झाली झाली असून धरणा मध्ये एकूण पाणी साठा 298.665 दलधमी असून (78.12%) धरणा मध्ये पाण्याची आवक 4400 cusecs असून निर्धारित ROS नुसार पाणी पातळी राखणे करिता धोम धरणांचे सांडवा व्दार क्र 1,5 व 2 आणि 4 हे 0.50मी ने उघडून कृष्णा नदी मध्ये एकूण 3400 cusecs विसर्ग सोडण्यात आलेला आहे. तसेच पावसाचे प्रमाण व आवक नुसार सांडव्याचे विसर्ग पुर्व सुचना देऊन कमी/ जास्त करण्यात येईल. धरणा खालील सर्व गावातील प्रशासन व ग्रामस्थ यांनी सतर्क राहून नदी पात्रात प्रवेश करू नये.