कराडला ग्रामपंचायतीला 75.01 टक्के मतदान : सर्वाधिक टेंभूत 93.22 टक्के मतदान, उद्या मतमोजणी
कराड | कराड तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीची निवडणुक रविवारी किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली. यात सरासरी 75.01 टक्के मतदान झाले. टेंभू येथे सर्वाधिक 93.22 टक्के मतदान झाले. तर बहुचर्चित रेठरे बुद्रुक येथे 69. 25 टक्के मतदान झाले आहे. उद्या सोमवारी सकाळी 9 वाजता प्रशासकीय इमारतीच्या तळ मजल्यावर मतमोजणी होणार आहे.
जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान मुदत संपणाऱ्या कराड तालुक्यातील एकुण 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यातील करंजोशी, सावरघर, यशवंतनगर व पुर्न.डिचोली या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरीत 12 ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी साडेसात वाजता ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान करण्यात आले.
यात ग्रामपंचायत निहाल झालेले मतदान पुढीलप्रमाणे, भोसलेवाडी 85.27 टक्के, बानुगडेवाडी 91.96 टक्के, गोसावेवाडी-92.33 टक्के, हेळगाव 80.60 टक्के, कांबीरवाडी 92.33 टक्के, पिंपरी-81.89 टक्के, शेळकेवाडी (येवती) 59.61 टक्के, येणपे-71.78 टक्के, येवती 63.09 टक्के, रेठरे बु. 69.25 टक्के, सयापुर 83 टक्के व टेंभू 93.22 टक्के इतके मतदान झाले.