बाजार समिती निवडणूक : जिल्ह्यात 9 बाजार समितीत 86 अर्ज बाद
सातारा | जिल्ह्यात 9 बाजार समितीच्या निवडणुका लागल्या असून बुधवारी अर्ज छाननी दिवशी मोठ्या प्रमाणावरती अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे आता अर्ज माघारीकडे लक्ष लागले आहे. सातारा जिल्ह्यात 9 बाजार समितीसाठी एकूण 86 अर्ज बाद ठरले तर जिल्ह्यात 822 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.
सातारा बाजार समितीत दाखल 61 अर्जांपैकी सहा अर्ज वैद्य ठरले असल्याने 55 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. कराड बाजार समिती दाखल 80 अर्जापैकी तीन अर्ज अवैद्य ठरले असून 4 दुबार अर्ज आहेत. त्यामुळे 73 उमेदवार अवैध ठरले आहेत. फलटणला दाखल झालेल्या 121 अर्जांपैकी 12 अर्ज छाननी मध्ये अवैध ठरले. तर राजे गटाच्या 2 जागा बिनविरोध झाल्या. कोरेगाव बाजार समितीत 155 अर्जांची छाननी झाली असता त्यामध्ये 24 उमेदवारी अर्ज विविध कारणांमुळे अवैध ठरले.
जावळी बाजार समितीत 121 अर्जांपैकी 22 उमेदवारी अर्ज अवैध ठरले. पाटण बाजार समितीमध्ये दाखल 60 उमेदवारी अर्जांपैकी सर्वच्या सर्व 60 अर्ज वैध ठरले. येथे एकही उमेदवारी अर्ज अवैध झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उमेश उमरदंड यांनी दिली. लोणंद बाजार समितीत 100 दाखल अर्जापैकी केवळ एकच अर्ज बाद झाला तर पाच अर्जांवर शेतकरी असल्याचा दाखला नसल्याने आक्षेप घेण्यात आला आहे. त्याची सुनावणी होऊन त्याचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. वाई बाजार समितीत दाखल 38 अर्जांपैकी पाच अर्ज बाद करण्यात आले आहेत. वडूज बाजार समितीत 177 दाखल अर्जांपैकी 14 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत.