कराड बाजार समिती निवडणूक: भाजप आणि राष्ट्रवादीच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार जाहीर
कराड | शेती उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या शेतकरी विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केले. मात्र, या पत्रकार परिषदेत भाजपचे डॉ. अतुल भोसले हे अनुपस्थित असल्याने चर्चा रंगली.
आ. बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, माजी सभापती देवराज पाटील, जयंत काका पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, प्रशांत यादव आदी उपस्थित होते.
कृषी विकास सेवा सोसायटी मतदार संघातून पुढील प्रमाणे :- उमेदवार सर्वसाधारण गटातून :- जगदीश दिनकरराव जगताप, मानसिंगराव वसंत जगदाळे, दयानंद भीमराव पाटील, उद्धवराव बाबुराव फाळके, विनोद रमेश जाधव, दत्तात्रय वसंतराव साळुंखे, जयवंत बबन मानकर. महिला प्रतिनिधी गटातून :- मालन देवाप्पा पिसाळ, रेखाताई दिलीप पवार. इतर मागास प्रवर्गातून :- फिरोज अल्ली इनामदार. विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून :- मारुती आनंदा बुधे. पंचायत मतदार संघातून सर्वसाधारण गटातून :- मानसिंग आनंदराव पाटील, प्रदीप रघुनाथ शिंदे. अनुसूचित जाती- जमाती गटातून :- अंकुश रामचंद्र हजारे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक गटातून :- आनंदराव भीमराव मोहिते. तर व्यापारी अडते मतदारसंघातून :- संतोष कृष्णत पाटील, राजेश रणजीत शहा