कराड बाजार समिती निवडणूक : दुरंगी लढत, रयत पॅनेलचे उमेदवार जाहीर
कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 23 जणांनी अर्ज मागे घेतले. तर 17 जागांसाठी 34 जण रिंगणात असल्याने दुरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. स्वर्गीय लोकनेते विलासराव पाटील (काका) रयत पॅनलचे अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
रयत पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे :- सोसायटी मतदारसंघ सर्वसाधारण गटातून ः- विजयकुमार सुभाष कदम, मोहनराव एकनाथ माने, अशोक बाबुराव पाटील, दीपक (प्रकाश) आकाराम पाटील, शैलेश उत्तमराव चव्हाण, प्रमोद बाळासो कणसे, वामन संतराम साळुंखे, महिला राखीव गटातून ः- विजयमाला रामचंद्र मोहिते, इंदिरा बाबासो जाधव- पाटील, भटक्या विमुक्त जाती ः- संभाजी श्रीरंग काकडे, इतर मागास प्रवर्गातून ः- सर्जेराव रामचंद्र गुरव, ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटातून ः- संभाजी लक्ष्मण चव्हाण, राजेंद्र रमेश चव्हाण, आर्थिक दुर्बल गटातून ः- शंकर दिनकर इंगवले, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून ः- नितीन भीमराव ढापरे. व्यापारी अडते मतदारसंघातून ः- जयंतीलाल चतुरदास पटेल, जगन्नाथ बळी लावंड.
कराड बाजार समितीच्या निवडणुकीत काॅंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्व. विलासराव पाटील (काका) रयत पॅनेल आणि माजी सहकार मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डाॅ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनेल यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.