क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा
कराड- पाटण मार्गावर दुचाकीच्या धडकेत एकजण जागीच ठार

पाटण | कराड- पाटण मार्गावर आडुळ येथे दुचाकीस्वाराने पादचाऱ्याला धडक दिल्याने त्यामध्ये पादचारी जागीच ठार झाला. याप्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल रघुनाथ लुगडे (रा. लुगडेवाडी, ता. पाटण) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.
याबाबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लुगडेवाडी येथील अनिल लुगडे हे कराड- पाटण रस्त्याने पायी चालत निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, अरुण लुगडे हे जागीच ठार झाले.
या अपघातप्रकरणी दुचाकीचालक अवधूत यशवंत खांडके याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पाटण पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.