कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
फुले- शाहू- आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये काम करणारे ज्येष्ठ नेते, माजी शेती उत्पन्न बाजार समिती संचालक दयाराम काळोखे यांचे चिरंजीव राहुल काळोखे यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. त्यांनी सलग पंधरा वर्ष ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच पद चांगल्या पद्धतीने सांभळले, असल्याचे गाैरवोद्गार प्रियदर्शनी उद्योग समूहाचे संस्थापक व माजी नगरसेवक अशोकराव पाटील यांनी काढले.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात राहूल काळोखे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष आणि चचेगावचे माजी उपसरपंच राहुल काळोखे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रियदर्शनी उद्योग समूहाचे संस्थापक माजी नगरसेवक अशोकराव पाटील, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष संजय तडाके, तालुका उपाध्यक्ष तानाजी चव्हाण, शहाजी चोपडे, शेखर पाटील- सुपनेकर आदी उपस्थित होते.
भानुदास माळी म्हणाले, स्व. विलासरावजी पाटील (काका)- उंडाळकर यांच्या प्रेरणेने माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण बाबा व उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत काळोखे परिवार कार्यरत आहे. सामाजिक आर्थिक राजकीय व बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असणारे उद्योजक व सामाजिक कार्याची आवड असणारे राहूल काळोखे हे गोरगरीब गरजू लोकांच्या अडचणीला धावून जाणारे उपक्रमशील नेतृत्व म्हणून कराड तालुक्यामध्ये सुपरिचित आहे.