क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

फलटण तालुक्यात 5 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद : चोरी, मारहाण, जनावरांची कत्तल आणि गोमांस आढळले

फलटण प्रतिनिधी | अनमोल जगताप
फलटण शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या ५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये दारूच्या नशेत दोघांनी एकाला मारहाण केली. कुरेशीनगर येथे गोमांस विक्रीसाठी नेताना ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल आढळून आला. निबंळक येथे पती- पत्नीस मारहाण करण्यात आली. कुरेशीनगर येथे जनावरे कत्तलीसाठी नेताना १० लाखांचा मुद्देमाल सापडला. मलठण येथे ६५ हजारांची फर्निचर दुकानात चोरी करण्यात आली.

गॅलक्सी चाैकात दोघाना मारहाण
दारूच्या नशेत एकास मारहाण केल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण येथील गँलँक्सी हाँटेल नाना पाटील चौकात मनोज इंगळे (रा. आखरी रस्ता मंगळवार पेठ फलटण) व त्याचा अनोळखी मित्राने दारुच्या नशेत फिर्यादी रिझवान मोहम्मद इलीयास खान (रा.संतोषीमाता नगर मलटण) शिवीगाळ दमदाटी करुन बिअरच्या तीन बाँटल व लोखंडी गज याने डोक्यात मारुन जखमी केले आहे.

कुरेशीनगर येथे गोमांस आढळले
कुरेशी नगर येथे एका चारचाकी गाडीत गोवंशीय मासाचे तुकडे कत्तल केलेल्या जनावरांचे गोमांस विक्री करणे करता भरलेले आढळून आल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गाडी मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात ५ लाख २५ हजार रुपये किंमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

निंबळक येथे पती- पत्नीस मारहाण
मौजे निंबळक येथे जुन्या भांडणाच्या कारणातून पती- पत्नीस मारहाण केल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शोभा सुरेश पवार (रा. निंबळक ता. फलटण) यांनी दिली.  घरासमोर फिर्यादी व फिर्यादीचा पती सुरेश पवार असे बसले असताना फिर्यादीचा दिर तपास्या आस्मान पवार व त्याची पत्नी जया तपास्या पवार यांनी जुन्या भांडणाचे कारणावरून फिर्यादीस व फिर्यादीचे पती सुरेश पवार यांना मारहाण करण्यात आली.

कुरेशीनगर येथे १० लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त
कुरेशीनगर येथे एका टेम्पोत लहान वासरे कत्तल करण्याचे हेतुने बेकायदा डांबून ठेवल्याचे आढळून आल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी गाडीसह एकूण १० लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस शिपाई काकासो कुंडलिक कर्णे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गुन्ह्याचा अधिक तपास पो.हवा विरकर करत आहेत.

मलठण येथे फर्निचरच्या दुकानात चोरी
मलठण येथील फर्निचर दुकानात अज्ञात चोरट्यानी केलेल्या चोरीत मुदेमाल व रोख रक्कम अशी एखून ६५ हजाराची चोरी झाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे. जिंती नाका फलटण येथील मारुती नारायण कचरे (रा. पाण्याचे टाकीजवळ सगुना माता नगर मलटण ता. फलटण) यांच्या ओम गजानन फर्निचर दुकानाचे किचनच्या दरवाज्याचा कोंयडा कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून आत प्रवेश केला. अधिक तपास पो. ना. घाडगे हे करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker