केरळ | केरळ येथे मलप्पुरममध्ये डबलडेकर बोट उलटून 21 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. या बोटीतून अंदाजे 40 पर्यटक पर्यटन करत असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी एनडीआरएफ पथक पोहचले असून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
केरल: मलप्पुरम ज़िले के तनूर के पास एक पर्यटक नाव पलट गई। रेस्क्यू ऑपरेशन अब भी जारी है। अब तक 21 लोगों के मृत्यु की हो चुकी है।
(वीडियो देर रात किए गए सर्च ऑपरेशन का है) pic.twitter.com/3sAPE0E5QT
— ANI_HindiNews (@AHindinews) May 8, 2023
या दुर्घटनेची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली आहे. रात्री अंधार असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण होत होते. बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरलेले होते, असे घटनास्थळारून सांगण्यात येत आहे. अजूनही अनेकजण बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू आहे. तर 10 जणांना नदीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.
Pained by the loss of lives due to the boat mishap in Malappuram, Kerala. Condolences to the bereaved families. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be provided to the next of kin of each deceased: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 7, 2023
केरळ सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. पर्यटकांचा शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून डबलडेकर बोटीतील खालील भागातून प्रवास करणारे पर्यटक बुडाल्याचे सांगण्यात येत आहे.