संजय राऊत चुकीचं भविष्य सांगणारा पोपट : शंभूराज देसाई

सातारा | संजय राऊत यांच्यासारखा माझा अजून हात बघायचा अभ्यास झालेला नाही. पहिल्या काळात जसे पोपटाच्या चिठ्ठी वरून भविष्य बघायचे. त्यातील संजय राऊत म्हणजे चुकीची चिट्टी काढून भविष्य सांगणारा पोपट आहे, अशा शब्दात संजय राऊत यांची उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी खिल्ली उडवली.
सातारा येथे माध्यमांशी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संवाद साधला. यावेळी ते पुढे म्हणाले, आम्ही मे 2022 पर्यंत सर्व 56 आमदार उद्धव ठाकरेंसोबत होतो. आमचे संख्याबळ असल्यामुळे महाविकास आघाडी बनवण्यासाठी इतरांना मातोश्रीवर यावे लागत होते. लोकशाहीमध्ये संख्या बळाला महत्त्व आहे. आज संख्याबळ घटलं आपल्या जवळचे विश्वासू आमदार खासदार निघून गेले की काय वेळ येते. यामुळे उद्धव ठाकरे यांनी मातोश्री वरून सिल्वर ओकच्या पायऱ्या चढल्या हे सर्व पाहताना मनाला थोडं खटकलं.
महाबळेश्वरला मंत्रिमंडळाची बैठकची वेळ निश्चित
महाबळेश्वर येथे मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. मंत्रालयातील शासकीय कामांना कोणताही परिणाम न होता. शनिवार व रविवारी बैठक घेण्यासाठी मी आग्रही आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून तारीख नक्की केली जाणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.