क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा
Satara News : ग्राहकाच्या हातात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट
कराड | उंडाळे (ता. कराड) येथे मोबाईलच्या दुकानात ग्राहकाच्या हातात बॅटरीचा अचानक स्फोट झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मोबाईल बॅटरीचा स्फोट होण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
याबाबतची अधिक माहिती अशी, उडाळेतील बाळसिद्ध मोबाईल शॉपीत मोबाईल दुरुस्त करण्यासाठी ग्राहक आला होता. मोबाईल दुरुस्तीला दिल्या नंतर मोबाईल दुकानदाराने त्या मोबाईलची बॅटरी काढून ग्राहकांला परत दिली. यावेळी ग्राहकांने ती बॅटरी तेथेच खोलण्याचा प्रयत्न केला असता, बॅटरीचा स्फोट झाला.
सदरचा सर्व प्रकार CCTV च्या कॅमेरात चित्रीकारण झाला आहे. दुकानात स्फोट झाल्याने दुकान मालकासह ग्राहकांची तारांबळ उडाली. या घटनेची सध्या मोठी चर्चा सुरू आहे.