साताऱ्यात चोरीच्या 888 किलो तांबा धातूच्या विटा जप्त : संशयित 6 महिला ताब्यात
सातारा | सातारा येथील एम. आय. डी. सी. येथील वेदांत इलेक्ट्रीकल कार्पोरेशन, विपूल इंटरप्रायजेस येथे तांबा तार चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात 6 महिला आणि पुरूष यांच्याकडून 888 किलो वजनाच्या तांब्याच्या धातूच्या विटा आणि 11 बॅटरी असा एकूण 6 लाख 7 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या गुन्ह्यात प्रमोद किसन आंदेकर (रा. करंजे सातारा) व सहा महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे व तांत्रिक विश्लेषनाद्वारे एम. आय. डी. सी. सातारा येथील वेदांत इलेक्ट्रीकल कार्पोरेशन, विपूल इंटरप्रायजेस येथील तांबा तार चोरी महिलांनी मिळून केली आहे. सदरची माहिती पोउनि अमित पाटील व पथकास सांगून पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पथकाने महिला/पुरुष अंमलदार यांच्या मदतीने 6 महिला आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपास केला. सदर चोरीतील तांब्याच्या तारा ज्या दुकानदारास विकल्या होत्या, त्याच्याकडून 888 किलो वजनाच्या 5 लाख 77 हजार 200 रुपये किंमतीच्या तांब्याच्या धातूच्या विटा हस्तगत करण्यात आल्या. तसेच सदर महिला आरोपी यांनी सातारा शहर पोलीस ठाणे अंतर्गत चोरीस गेलेल्या 30 हजार रुपये किंमतीच्या एकुण 11 बॅटरी हस्तगत केल्या. सदरील संशयित आरोपींकडून एकूण 2 चोरीचे गुन्हे उघड करुन एकूण 6 लाख 7 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा. सपोनि संतोष पवार, रविंद्र भोरे, विश्वास शिंगाडे, पोउनि अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित सपकाळ, गणेश कापरे, मोहन पवार, प्रविण कांबळे, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, शिवाजी गुरव, महिला पोलीस अंमलदार दिपाली यादव, मोना निकम, शकुंतला सणस, अनुराधा सणस, तृप्ती मोहिते, दिपाली नामदे यांनी सहभाग घेतला.