सत्यजित केसरी 2023 : अटीतटीच्या लढतीत फायनलची ढाल चिठ्ठीवर, पहिला नंबर विभागून
कराड | कराड पंचायत समितीचे माजी सदस्य नामदेव पाटील (आप्पा) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य अोपन बैलगाडी शर्यतीत फायनल अटीतटीच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या लढत पहायला मिळाली. सत्यजित केसरी 2023 चे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस दोन बैलगाड्यांना विभागून देण्यात आली. पहिल्या क्रमांकाची ढाल चिठ्ठीद्वारे आरोही मोहन देंडगे (नांदेड, सिटी पुणे) यांना तर दुसऱ्या क्रमाकांची ढाल बाहुल्या ग्रुप (वारूंजी) यांना देण्यात आली.
वारूंजी येथे पर्व 2 रे सत्यजित केसरीचे उदघाटन माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, युवा उद्योजक सुनिल बामणे, बाजार समितीचे उपसभापती संभाजी चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर रयत कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील, बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम, संचालक प्रकाश पाटील, नितीन ढापरे, काॅंग्रेसचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर आदीच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी बैलगाडा मालक व चालक यांच्यासह प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. या शर्यतीत विजेत्यांना 1 लाख रूपये रोख, 75 हजार रूपये, 50 हजार रूपये, 35 हजार रूपये, 25 हजार रूपये आणि 15 हजार रूपये रोख बक्षीस देण्यात आले.
वारूंजीत आयोजित बैलगाडी शर्यतीत फायनलचे विजयी पुढीलप्रमाणे ः-
आरोही मोहन देंडगे (नांदेड, सिटी पुणे), बाहुल्या ग्रुप (वारूंजी) या दोन्ही गाड्यांना एक नंबरचे रोख रक्कम बक्षीस विभागून देण्यात आली. प्रथम क्रमाकांची ढाल आरोही मोहन देंडगे यांना चिठ्ठीद्वारे मिळाली. दुसऱ्या क्रमाकांची ढाल बाहुल्या ग्रुप (वारूंजी), तृतीय क्रमांक ः- कै. खाशाबा दाजी शिंदे (सैदापूर- वडकी) यांचा सर्जा आणि मिल्का, चतुर्थ क्रमांक ः- शाैर्य यादव संभा आप्पा (काले) यांचा सोन्या आणि राजा, पाचवा क्रमांक ः- बाळासाहेब शिंगण (कराड) यांचा सुलतान आणि इंजान, सहावा क्रमांक ः- अक्षय पोळ (आगाशिवनगर) यांचा महाराज आणि जादू,