सातारा व पुणे पोलिसांची कारवाई : दरोड्यातील इनोव्हा कार, छऱ्याचे पिस्तुलासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा | राष्ट्रीय महामार्गावर काशिळ गावच्या हद्दीत मध्यरात्री इनोव्हा कार बोलेरो गाडीस आडवी चालक व त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीच्या तोंडावर स्प्रेचा फवारा मारुन 9 जणांनी 17 लाख 62 हजार रुपये सोन्याचे व चांदीचे दागिण्यांवर दरोडा टाकला होता. या दरोड्यातील गुन्हेगारांना सातारा स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच दरोड्यातील सोन्या चांदीचे दागिणे, गुन्ह्यात वापरलेले छऱ्याचे पिस्टल, तीन चॉपर, इनोव्हा कार व मोबाईल हॅन्डसेट असा मिळून 24 लाख 72 हजार 820 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरील दरोडा उघडकीस आणण्यासाठी स्वतंत्र तीन पथके तयार करुन त्यांना गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात येत होता. तपास पथकास पुणे येथे असणाऱ्या आरोपींच्या ठाव ठिकाण्याबाबत माहिती प्राप्त झाली. पोलीस पथके आरोपींच्या मागावर असताना आरोपींची गाडी सोलापूर हायवेने जात असल्याचे निदर्शनास येताच यवत पोलीस ठाण्याशी संपर्क करुन कासुर्डी टोलनाका येथे नाकाबंदी करून यवत पोलीस ठाण्याचे स.पो.नि. स्वप्नील लोखंडे यांनी इनोव्हा कार व 2 आरोपी पकडले. स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामिण यांच्या मदतीने गुन्हयातील आणखी 3 आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा सातारा पथकास यश आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 17 लाख 19 हजार 820 रुपये किमतीचे सोन्या- चांदीचे दागिणे तसेच गुन्ह्यात वापरलेले त्याचे पिस्टल, तीन चॉपर, इनोव्हा कार व मोबाईल हॅन्डसेट असा मिळून 24 लाख 72 हजार 820 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. दरोड्यातील 4 जण कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामिण पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, चामळे यवत पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविद्र भोरे, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे बोरगाव पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेचले, प्रविण फडतरे, अमोल माने, राकेश खाइके, मोहन नाचण, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, शिवाजी भिसे, विक्रम पिसाळ, स्वप्नील माने, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, रोहित निकम, स्वप्नील दौंड, संकेत निकम, शिवाजी गुरव यांनी सदरची कारवाई केली.