साताऱ्यात राष्ट्रवादीला धक्का : आमदाराच्या भावाचा शिवसेनेत प्रवेश

सातारा | सातारा जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जन्मगाव तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. अशावेळी भाजप- शिवसेना युती राष्ट्रवादीचे प्राबल्य कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे वरचढ कोण ठरणार निवडणुकीनंतर कळणार असले तरी राष्ट्रवादीला शिवसेना (शिंदे गटाने) धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांचे भावाने शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.
माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. ऋषीभाई यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने सातारा जिल्ह्यासह जावली तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत वर्षा बंगल्यावर हा ऋषीभाई यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.
याप्रसंगी नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले, झोपडपट्टी पुनर्वसन विकास राज्यमंत्री दर्जा विजय नाहटा, वाशी नवी मुंबई शिवसेना संपर्कप्रमुख मा. नगरसेवक किशोर पाटकर तसेच घणसोली विभागातील ऋषिकांत शिंदे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्तेसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.



