वाहतुकीत बदल : महाबळेश्वर, पाचगणीला निघालाय थांबा, बातमी वाचा
सातारा | महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर व पाचगणी ही जागतिक दर्जाची थंड हवेची पर्यटन स्थळे म्हणुन प्रसिद्ध आहेत. सदर ठिकाणी राज्यातुन तसेच देशातून लाखो पर्यटक पर्यटनांकरीता भेट देत असतात. तसेच पर्यटनाकरीता येणारी विदेशी पर्यटकांची संख्याही मोठया प्रमाणात आहे. सध्या उन्हाळयाच्या सुट्टया सुरू असलेने वाहतुक कोडी होऊन पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकरीता प्रायोगिक तत्त्वावर दि. 7/6/2023 ते दि. 25/6/2023 रोजी पर्यंत दर शुक्रवार, शनिवार, रविवार यादिवशी खालील प्रमाणे वाहतुक मार्गात बदल करणे अत्यावश्यक झाले आहे. सदर वाहतुक मार्गातील बदलाबाबत जनतेच्या हरकती व सूचना असल्यास त्यांनी त्या हरकती disttraffic.satara@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर पाठवाव्यात. सदर हरकतींचा सांगोपांग विचार करून अंतिम अधिसूचना निर्गमित करण्यात येईल.
दि. 7/6/2023 ते दि. 25/06/2023 पर्यंत दर शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी वाहतूक मार्गातील बदलाबाबत…
-मुंबई- पुणे बाजुकडुन महाबळेश्वर करीता येणारी वाहनांची वाहतुक सुरुर फाटा – वाई- पाचगणी महाबळेश्वर (एकुण- 48 कि.मी.) ला जाईल.
-पाचगणी बाजुकडुन पुणे मुंबईकडे जाणेसाठी पाचगणी वाई सुरूर फाटा यामार्गाचा वापर पर्यटकांना करता येणार नाही. त्याकरीता पाचगणी संजिवन विद्यालय, पाचगणी, रुईघर महु डॅम रोडने
– करहर कोळेवाडी कुडाळ पाचवड फाटा मार्गे पुणे या मार्गाचा वापर करण्यात येईल.
– महाबळेश्वर बाजुकडुन पुणे मुंबई करीता जाणारी वाहतुक महाबळेश्वर वरून मेठा कुडाळ- पाचवड फाटा मार्गे पुणेबाजुकडे जाईल किंवा महाबळेश्वर- मेढा- सातारा पुणे अशी पुणे मुंबई कडे जाईल.
– महाबळेश्वर बाजुकडुन कोल्हापुर व कोल्हापुर बाजुकडुन महाबळेश्वर कडे जाणेसाठी सातारा मेढा महाबळेश्वर यामार्गाचा वापर करता येईल.
– महाबळेश्वर बाजुकडुन पुणे मुंबई कडे जाणारी वाहतुक पाचगणी मार्गे जाणेचा प्रयत्न करतील त्यांना लिंगमळा भेकवली मार्गे महाबळेश्वर मेढा रोडवरील लिंगमळा फाटा – मेढा- कुडाळ- पाचवड फाटा मार्गे पुणेबाजुकडे वळविली जाईल.
वरिल प्रमाणे मुंबई- पुणे बाजुकडुन महाबळेश्वर करीता येणारी वाहनांची वाहतुक सुरूर फाटा वाई पाचगणी महाबळेश्वर ला जाईल तसेच महाबळेश्वर बाजुकडुन पुणे मुंबई करीता जाणारी वाहतुक महाबळेश्वर वरून मैदा कुडाळ- पाचवड फाटा मार्गे पुणे मुंबई – कडे जाईल तसेच पाचगणी वरुन पुणे मुंबई कडे जाणारी वाहतुक संजिवन विद्यालय – पाचगणी, रुईधर महु हॅम रोडने – करहर कोळेवाडी कुडाळ पाचवड फाटा मार्गे पुणे- – मुंबईकडे जाईल. वरील प्रमाणे वाहतुक मार्गात बदल करणेकरीता अधिसुचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.. तरी वरील प्रमाणे वाहतुक मार्गातील बदलासाठी सर्व नागरीकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे