सुप्रिया सुळेंचा कार्यकारी अध्यक्ष पदाचा ‘तो’ प्रस्ताव कुणी दिला? : खासदार वंदना चव्हाणांचा गौप्यस्फोट
मुंबई | आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षांच्या नेमणुकीची घोषणा केली आहे. मात्र, यावेळी हा कार्यक्रम संपल्या संपल्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मात्र तेथून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ते कुठे आणि का गेले याबद्दल विचारणा होवू लागली होती.
याबाबत आता खासदार वंदना चव्हाण यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम द्यावा, असा गाैप्यस्फोट केला आहे. त्या म्हणाल्या, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणुक झाली याचा आनंद झाला आहे. त्याचबरोबर इतर नेत्यांवर देखील विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तर आमच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्याने आम्हाला देशात ताकद वाढवण गरजेचं आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय आहे. असं देखील त्या म्हणाल्या.
पुढे त्यांनी सांगितेले की, ज्यावेळी शरद पवारांनी राजीनामा दिला होता. यानंतर काय असा प्रश्न विचारला जात होता. साहेबांनी राजीनामा मागे घ्यायाला नकार दिला तर काय कारायचं त्यावेळी अजित पावारांनीच सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करण्यात याव यासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. असा मोठा गौप्यस्फोट वंदना चव्हाण यांनी केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणखी वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान अजित पवार यांनी ट्विट करत त्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.