कोटा अकॅडमीचे MHT -CET परीक्षेत घवघवीत यश

कराड । नुकताच MHT -CET परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कराड येथील कोटा अकॅडमी (Kota Academy) मधील 25 विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये 99. 62 पर्सेन्टाइल मिळालेला प्रथम क्रमांक आहे. याचबरोबर 90 पर्सेंटाइल पेक्षा अधिक गुण मिळवणारे 6 विद्यार्थी आहेत. 85 पर्सेंन्टाइल वरती 5 विद्यार्थी आहेत. 80 पर्सेंटाइल च्या वरती 2 विद्यार्थी, 70 पर्सेन्टाइल च्या वरती 4 विद्यार्थी तसेच 60 पर्सेन्टाइलच्या वरती 4 विद्यार्थी विद्यार्थी आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे कोटा अकॅडमी व कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे संचालक डॉ. महेश खुस्पे व सौ. मंजिरी खुस्पे यांनी अभिनंदन केले. यावेळी कु. मैथिली खुस्पे, प्राचार्या सौ. जयश्री पवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सन 2006 पासून कराड येथे कोटा अकॅडमी कार्यरत असून गेल्या 18 वर्षांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी आयआयटी -जेईई ,नीट, एमएचटी-सीईटी, एनडीए सारख्या परीक्षांमध्ये यश मिळवले आहे.
कोटा अकॅडमीमध्ये आठवी, नववी, दहावी या वर्गांची फाउंडेशन पासूनची तयारी करून घेतली जाते. त्यामुळे आठवीपासूनच मुलांना आयआयटी -जेईई, नीट, एमएचटी- सीईटी, एनडीए सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी होते. इयत्ता 8 वी ते 12 वी वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, तरी ज्या विद्यार्थ्यांना कोटा अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन अकॅडमीचे संचालक डॉ. महेश खुस्पे सरांनी केले आहे.