कराडजवळ नृसिंहवाडी- मेढा एसटी बस आणि दुचाकीचा अपघात
कराड । भागवत ट्रान्सपोर्टच्या समोर यु टर्नला एसटी आणि मोटरसायकलचा अपघात झाला आहे. या अपघातामुळे मार्गावर काही काळ वाहतूकीचा खोळंबा झाला होता. यामध्ये मोटर सायकलवरील एकजण जखमी झाला आहे. जखमींला तातडीने कृष्णा हाॅस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नृसिंहवाडी- सातारा- मेढा एसटी बस क्रमांक (एमएच- 07-सी- 7143) आणि मोटार सायकल क्रमांक (एमएच-11- ए़डी- 4719) यांचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवर संचित रमेश कुदळे (वय- 23, रा. ओंड, ता. कराड) व राहूल वसंत कुंभार (वय- 24, रा. ओंड, ता. कराड) हे दोन जण होते. त्यामधील संचित कुदळे हा जखमी झाला आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक खोळंबा झाला होता.
अपघाताची माहिती मिळताच दस्तगीर आगा, जगन्नाथ थोरात, कराड शहर पोलीस स्टेशनचे प्रशांत जाधव, श्री. चतुर यांच्यासह नागरिकांच्या सहकार्याने जखमीला तातडीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.