Satara News : पोलिस दलातील विवाहित महिलेची गळफास घेवून आत्महत्या
फलटण | फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीमधील चौधरवाडी येथील रहिवाशी व पोलीस दलात कार्यरत असलेल्या विवाहितेने रहात्या घरी लोखंडी अँगलला नायलॉनच्या रस्सीच्या गळफास घेवून आत्महत्या केली. ऋतुजा सुशांत रासकर (वय 22, रा. नागेश्वरनगर चौधरवाडी ता. फलटण, जि. सातारा.) असे विवाहितेचे नाव असून. या आत्महत्येनंतर परिसरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.
शहर पोलिसांकडूंन व घटनास्थळावूर मिळालेली माहिती अशी, फिर्यादी व मृत महिलेचे सासरे फळविक्रेते बाळू रासकर यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यांचा मुलगा सुशांत हा खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत असून फिर्यादीची पत्नी फळ विक्रीचा व्यवसाय करते. फिर्यादी यांची पत्नी ताई रासकर या जिंतीनाका येथे फळांची विक्री करण्यासाठी गेल्या होत्या. तर मुलगा गाडी घेवून बाहेरगावी गेला होता. शनिवारी दुपारच्या सुमारास बाहेर पाऊस येत असल्याने बाहेरील कपडे ऋतुजाने घरात नेले. त्यानंतर पाळीव मांजर बांधण्यसाठी बाळू रासकर हे ऋतुजाच्या खोलीकडे गेलो तेव्हा हाका मारल्या. मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. फिर्यादी यांनी दरवाजा उघडून पाहिले असता सून ऋतुजा हिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
फिर्यादी यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले आणि घराशेजारील लोकासमवेत फलटण शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. ऋतुजा रासकर हिने कोणत्या कारणांतून आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे परिसरांतून हळहळ व्यक्त होत आहे. फलटण शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.