तलाठी रंगेहाथ सापडला : सातबाऱ्यावरील नाव कमी करण्यासाठी 8 हजाराची मागणी
सातारा | सातबाऱ्यावर असलेले बोगस नावाची नोंद कमी करण्यासाठी 8 हजार रूपयांची मागणी करणाऱ्या तलाठ्याला लाच घेताना लाचलुचपत विभाग सातारा यांनी रंगेहाथ पकडले आहे. संजय जगन्नाथ मुळे (वय- 54 वर्ष, सजा- तोडले, ता. माण, जि. सातारा) असे लाच घेताना सापडलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी, तक्रारदार यांचे सातबारावर बोगस नावाची नोंद झाली होती. ते नाव कमी करण्यासाठी व त्याप्रमाणे कमी केलेल्या नावाचा सातबारा देण्याकरिता लोकसेवक संजय मुळे यांनी 8000/- रु लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सध्या तलाठ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्याचे पोलीस उप अधीक्षक श्रीमती उज्वल वैद्य, पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोहवा नितीन गोगावले, पो.ना. निलेश राजपुरे यांनी सापळा रचून कारवाई केली.