पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शिवशंभू दूध संघाची निवडणूक बिनविरोध
दूध संघाच्या चेअरमनपदी अधिकाराव पाटील तर व्हाईस चेअरमनपदी संजय शिर्के
कराड । विशाल वामनराव पाटील
महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली दौलतनगर (ता.पाटण) येथील शिवशंभू दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळाची सन 2023-24 ते 2028-29 ची पंचवार्षिक निवडणूक नुकतिच बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती गितांजली कुंभार यांनी काम पाहिले.
शिवशंभू दूध संघाच्या चेअरमनपदी अधिकाराव पाटील तर व्हा. चेअरमन पदी संजय शिर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित चेअरमन, व्हा.चेअरमन व नूतन संचालक मंडळाचे पालकमंत्री शंभूराज देसाई, चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांनी अभिनंदन केले.
या निवडणूकीत बिनविरोध संचालक मंडळ पुढीलप्रमाणे ः- सर्वसाधारण गटातून सर्जेराव शिर्के (आडूळ), किसन कवर (पिंपळगाव), आबासो शिंदे (आबदारवाडी), पांडूरंग पाटील (गारवडे), संजय शिर्के (आडूळपेठ), जयदिप जाधव (खोणोली), अधिक पाटील (पापर्डे), विलास देसाई (येराडवाडी), संदिप यादव (डेरवण), किशोर बारटक्के (तारळे), महिला राखीव गटातून सुशीला शेलार यांची बिनविरोध निवड झाली.