Satara News : जबरी चोरी करणाऱ्या दोन युवकांना दोन तासात अटक

सातारा | तेली खड्डा शनिवार पेठ, सातारा येथील जडी बुटी औषध विक्रेत्यास तंबाखू मागण्याचा बहाणा करून रेकॉर्डवरील सराईत युवकाने कोयत्याचा धाक दाखवून त्यास मारहाण करून जबरी चोरी केल्याची फिर्याद इंदलसिंग रतनसिंग चितोडीया (वय- 49, वर्षे मूळ रा. राजस्थान, सध्या रा. तेली खड्डा, सातारा) दिली आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली होती. सातारा शहर डी. बी. पथकाने अवघ्या दोन तासात यश सुरेश शिंदे (वय- 23) व अक्षय मधुकर तुपे (वय- 21, दोघेही रा. शनिवार पेठ, सातारा) संशयित युवकांचा शोध घेवून त्यांना सातारा शहरामधून ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तेली खड्डा शनिवार पेठ, सातारा येथील जडी बुटी औषध विक्रेत्यास तंबाखू मागण्याचा बहाणा करून रेकॉर्डवरील सराईत युवकाने कोयत्याचा धाक दाखवून त्यास मारहाण करून त्याचे खिशातील 500 रुपये, मोबाईल व कानातील सोन्याच्या बाळया जबरदस्तीने ओढून काढल्या. त्यामुळे कानास दुखापत होवून जखमी झाले होते. तसेच फिर्यादी याची डोक्यावरील टोपी काढून त्याचे साहयाने तोंड दाबले. त्यावेळी त्याचे मदतीस त्याचे नातेवाईक आले असताना. सदर युवकांनी कोयता हवेत फिरवून सदर ठिकाणी दहशत माजवून सदरचे युवक पळून गेले होते. सातारा शहर डी.बी. पथकाने संबंधित संशयितांचे वर्णन प्राप्त करून त्यावरून अवघ्या दोन तासामध्ये सदर युवकांचा शोध घेवून त्यांना सातारा शहरामधून ताब्यात घेतले. त्यांनी सदरचा गुन्हा केलेची कबूली दिली असून त्यांचेकडून गुन्हयातील दोन सोन्याच्या बाळया, रोख रक्कम, मोबाईल तसेच गुन्हयात वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आलेली आहे. यातील एका संशयितावर दरोडा, जबरी चोरी यासारखे तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, पोलीस उपअधिक्षक किरणकुमार सुर्यवंशी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांचे मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.हवा. सुजीत भोसले, पो.ना. निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, पो. कॉ. गणेश घाडगे, संतोष कचरे, सागर गायकवाड, सुशांत कदम. विशाल धुमाळ, गोरखनाथ माने, रोहित गायकवाड यांनी सदरची कारवाई केली आहे.



