Satara News : अवैध दारू वाहतूक करताना हाॅटेल मालक पोलिसांना सापडले
सातारा | सातारा शहरात दुचाकीवरून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन्ही वाहनचालक विसावा नाका येथील हॉटेल मालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दारुची चोरटी विक्री करणेसाठी विदेशी दारुची बेकायदा बिगरपरवाना वाहतुक करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी विदेशी दारु व वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकुण 1 लाख 75 हजार 755 रूपये किमंतीचा माल जप्त केला आहे. या प्रकरणात मदन दत्तात्रय शिंदे (वय- 29 वर्षे, रा. पेढ्याचा भैरोबा गडकर आळी, ता. जि. सातारा), संतोष रामदास मिरगे (वय- 35 वर्षे, रा. रहिमतपुर रोड – कोडोली सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहुपुरी पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक धनंजय फडतरे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, राधिका रोडने पांढरे व काळे रंगाचे दोन मोटारसायकलवरुन अवैध विदेशी दारुची वाहतुक होणार आहे. मिळालेल्या माहीतीप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सपोनी प्रशांत बधे व अंमलदार यांनी राधिका रोडवर सापळा रचला. पोलिसांनी राधिका सिग्नल चौकाजवळील भारत गॅस दुकानाचे समोर सदर गाड्यांचा पाठलाग करुन गाड्या थांबवल्या. तेव्हा मोटारसायकलची तपासणी केली असता त्यावर पिवळ्या व काळे लाल पिशविमध्ये विविध विदेशी ब्रँडच्या दारुच्या बाटल्या असल्याने पोलीसांनी दोन्ही मोटारसायकलवरील दोन इसमांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, दोन्ही वाहनचालक हे विसावा नाका येथील हॉटेल मालक असुन ते दारुची चोरटी विक्री करणेसाठी विदेशी दारुची बेकायदा बिगरपरवाना वाहतुक करत असल्याचे निष्पन्न झाले.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक बापु बांगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि. प्रशांत बधे, पो. हेड कॉ. सुरेश घोडके, पो.ना.मनोज मदने, निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे पो.कॉ.सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे यांनी केली आहे.