मलकापूरात रात्री कोबिंग ऑपरेशन : कोयता नाचविणाऱ्या युवकास पोलिसांनी घेतले ताब्यात
कराड । मलकापुर (ता. कराड) येथे रात्री 11.45 वाजता हातात कोयता घेवून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकास कराड शहर पोलिसाच्या गुन्हे अन्वेषन शाखेने ताब्यात घेतले आहे. रात्री कोबिंग ऑपरेशन करीत असताना ही कारवाई करण्यात आली. अशिष अरुण कुरले (वय- 26 वर्षे, रा. शनिवार पेठ मेनरोड पोलीस चौकी समोर कराड) असे संशयित युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मलकापुर (ता. कराड) येथे कोबिंग ऑपरेशन करीत असताना रात्री 11.45 वाजता एक युवक हातात कोयत्या सारखे घातक हत्यार घेवुन दहशत माजविण्याच्या इराद्याने जोरजोरात शिवीगाळ व आरडाओरडा करित होता. तो सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग होईल असे वर्तन करून नागरिकांचे जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करित होता. त्या युवकास जवळ बोलावले असता तो पोलिसांना बघून पळून जाऊ लागला. तेव्हा त्याला पाठलाग करून पोलिसांनी पकडले.
सदरील कारवाई पोलिस उपनिरीक्षक आर. एल. डांगे, सहाय्यक पोलिस फौजदार रघुवीर देसाई, पोलिस नाईक कुलदीप कोळी, संतोष पाडळे, पोलिस कॉन्स्टेबल महेश शिंदे, ऋषी लोहार, आनंदा जाधव, रईस सय्यद, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, पो. काॅ. राजू जाधव, महिला पो. कॉन्स्टेबल सोनाली पिसाळ यांनी केली.