आरोग्यम धनसंपदा : छातीत कफ झाल्यास हे करा ‘घरगुती उपचार’

हॅलो न्यूज आरोग्य | शरीरात अनेकदा कफ तयार होत असतो, अशावेळी आपण दवाखान्यात उपचारासाठी जात असतो. परंतु, पूर्वी कफ झाल्यास त्यावर घरगुती पध्दतीने उपचार केले जात होते. अनेकदा कफच्या समस्येकडे आजाराच्या दृष्टीने पाहिलं जातं. तेव्हा कफ झाल्यास घरगुती उपाय कोणते हे आपण जाणून घेणार आहोत.
आल्याच्या मदतीने काढा कफ – आल्याचा वापर तुम्ही कफची समस्या दूर करण्यासाठी करू शकता. यात अॅंटी-इंफ्लामेटरी प्रॉपर्टी असते. याने मळमळ आणि वेदनेचीही समस्या होऊ शकते. काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, आल्यामधील अॅंटी-इंफ्लामेटरी तत्वमुळे एअरवेज मेंबरेनमध्ये आराम मिळतो. ज्यामुळे कफची समस्या कमी होते. कफची समस्या असेल तर आल्याचा चहा सुद्धा फायदेशीर ठरतो. एक कप गरम पाण्यात 20 ते 40 ग्रॅम आलं बारीक करून टाकून चहा तयार करा. सोबतच लिंबाचा रस आणि मधही मिश्रित करू शकता.
कोरडा कफ असेल तर अधिक प्रमाणा म्युकस तयार होतो. अशात कफपासून सुटका मिळवायची असेल तर स्टीम घेणं चांगलं ठरू शकतं. स्टीम घेतल्यानंतर डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी एक ग्लास पाणी प्यावे. एका भांड्यातील पाण्यात हर्ब किंवा एसेंशिअल ऑइल जसे की, नीलगिरी किंवा रोजमेरी ऑइलचे काही थेंब टाकावे. स्टीम घेताना काही सेकंदाचा ब्रेकही घ्यावा नाही तर स्कीन बर्नची समस्या होऊ शकते.
कफ काढण्यासाठी तुम्ही मधाचा देखील वापर करू शकता. एका रिसर्चनुसार, औषधांपेक्षा मध अधिक प्रभावी ठरतं. यासाठी दोन चमचे मध हर्बल टी किंवा गरम पाण्यातून घ्या. मधात अॅंटी-बायोटिक गुण असतात. याने घशाला आराम मिळतो. सोबतच लिंबाचा रस घशाची खवखव कमी करण्यास मदत करतो.
कफ दूर करण्यासाठी तुम्ही पेपरमिंटचा देखील वापर करू शकता. पेपरमिंटची पाने म्हणजे पुदीन्याची पाने आपल्या हीलिंग तत्वांसाठी प्रसिद्ध आहेत. यातील मेंथॉल घशाची खवखव कमी करतं आणि याने कफ निघण्यास मदत होते. याने म्युकस ब्रेकडाउन करण्याचं काम होतं. तुम्हाला हवं तर तुम्ही पेपरमिंटचा वापर तुम्ही चहासाठीही करू शकता किंवा वेपर स्टीम बाथच्या रूपातही करू शकता.
कफ काढण्यासाठी ओव्याच्या पानांचा वापरही फायदेशीर ठरतो. यात थाइम हे तत्व असतं. एका रिसर्चमधून समोर आले आहे की, ओव्याच्या पानांचा रस सेवन केल्यास कफ दूर होतो आणि घशाला आराम मिळतो. ओव्याच्या पानांमध्ये फ्लेवोनोइड्स नावाचं तत्व असतं ज्याने घशाच्या मांसपेशींना आराम मिळतो. तसेच खोकलून खोकलून आलेली सूजही कमी होते.