आठ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

कराड | आठ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका युवकावर कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या बहिणीने फिर्याद दिली आहे. संबधित संशयितावर कडक कारवाई होवो, यासाठी कराड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांना निवेदन दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत आठ वर्षीय मुलीला आरोपीने त्याच्या घरी नेले. त्याठिकाणी त्याने त्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. त्याचवेळी आरोपी काहीतरी आणण्यासाठी दुसºया खोलीत गेला असताना पिडीत मुलगी तेथून पळाली. ती धावत इमारतीमधून खाली येऊन घराकडे पळत होती. त्यावेळी पिडीत मुलीच्या बहिणीने तिच्याकडे विचारपूस केली असता मुलीने रडतच घडलेला प्रकार सांगीतला. त्यानंतर कुटूंबियांनी याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, हिंदू एकता अांदोलनचे अजय पावसकर, रुपेश मुळे, हिंदू जनजागृतीचे अनिल कडणे, गणेश कापसे यांनी कराड शहराचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी गणेश महामुनी, चिंतामणी पारखे, अक्षय मोहिते, गणेश भोसले, किरण तांबिरे, प्रकाश जाधव, सागर चव्हाण, प्रताप घोरपडे, शिवाजी जाधव, नाना पिसाळ, गणेश पाटील, श्रीकांत जाधव, ऋत्विक जाधव उपस्थित होते.