रयत स्वाभिमानी संघटनेची राज्यभर सभासद नोंदणी : कराडात पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे
कराड | “गाव तिथे शाखा व घर तेथे कार्यकर्ता” या उद्देशानुसार रयत स्वाभिमानी संघटना संपूर्ण राज्यभर सभासद नोंदणी अभियान राबवत आहे. त्याचा प्रारंभ कृष्णा- कोयनेचा प्रीतीसंगम असलेल्या ऐतिहासिक कराडमधून होत असल्याचा मला अभिमान वाटतो. संघटनेचे सर्वच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी करून संघटनेचा प्रवाह बळकट करतील, याचा मला विश्वास आहे, असे प्रतिपादन रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर पवार यांनी केले आहे.
कराडच्या विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष सुशील कदम यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभासद मेळावा व पद नियुक्ती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष स्वातीताई माने, जिल्हा सचिव अभय जाधव, प्रदेश प्रवक्ता तथा जिल्हा कार्याध्यक्ष संदीप जाधव, जिल्हा सरचिटणीस निहाल इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष वंदनाताई पवार, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गुंजवटे,
युवक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सपनाताई भोसले आदी यावेळी उपस्थित होते.
सुशील कदम म्हणाले की, स्वयंरोजगार मार्गदर्शन, शासकीय योजनांची अंमलबजावणी, युवकांसाठी व्यवसाय निर्मिती व मोठमोठ्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगारांची उपलब्धता करून देण्यासाठी संघटना व्यापक प्रयत्न करत आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, महिला व सरकारी कर्मचारी आदी विविध समाजघटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच संघटनेमार्फत हेल्पलाइन सुरू करत आहोत.
पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान
दिलीप जगन्नाथ सुतार (उपजिल्हा सरचिटणीस), किरण सावंत (उपजिल्हा संघटक), अनुराधा राजेंद्र जाधव (कराड तालुका सरचिटणीस), सुमन बालिश गाडे (कामगार आघाडी), राणी संतोष दाभाडे (तालुका संघटक), निर्मला संजय पाटील (पाटण तालुकाध्यक्ष), वैशाली विठ्ठल देवकर (महिला आघाडी तालुकाध्यक्ष), नंदा शिवाजी शिंदे (महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष), शीतल राजेंद्र थोरात (कराड तालुका कार्याध्यक्ष), वैशाली आबासाहेब यादव (युवती आघाडी तालुका सरचिटणीस), कमल किरण सावंत (कराड तालुका सचिव), सुजाता पाटील (कराड तालुका युवती संघटक), अनिता धनाजी शिंदे (युवती आघाडी तालुकाध्यक्ष), माया बजरंग मदने (युवती आघाडी तालुका उपाध्यक्ष) या पदाधिकाऱ्यांना सागर पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.