मसूरला 76 वा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
मसूरच्या ऐतिहासिक झेंडा चौकात माजी सैनिक बबन कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजास मान्यवरांसह उपस्थितांनी सर्व शाळांनी सलामी दिली. तदनंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच पंकज दीक्षित यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. बाजारपेठेत सार्वजनिक झालेल्या कार्यक्रमात देशभक्तीपर गीते, बक्षीस वितरण, मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे मनोगत, लायन्स क्लबचा सायकल बँक उपक्रमांतर्गत सायकल वितरण आदी उपक्रम पार पडले.
जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, सरपंच पंकज दीक्षित, जागृत ग्राहकराजा संघटनेचे राज्य संघटक दिलीप पाटील, लायन्स क्लबचे प्रांतपाल जगदीश पुरोहित, वैद्यकीय अधिकारी डॉ रमेश लोखंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम दीक्षित, ऍड रणजितसिंह जगदाळे, ग्रामपंचायत सदस्या निलोफर मोमीन यांनी मनोगत व्यक्त केले. तदनंतर सर्व शाळांनी देशभक्तीपर गीतगायन केले. सातारा जिल्हा बँकेचे संचालक लहुराज जाधव, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे सिकंदर शेख, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. मसूरमधील शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण नावात स्वतःचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव असे क्रमशा लावण्या संदर्भात सरपंच पंकज दीक्षित यांनी आवाहन केले. या क्रांतिकारी निर्णयाचे कायद्यात रूपांतर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
गरिब व गरजू विद्यार्थ्यांना सायकली
शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना लायन्स क्लबच्या बँक उपक्रमाद्वारे लायन्स क्लबच्या प्राजक्ता पंकज दीक्षित (दोन सायकल), ऍड. रणजितसिह जगदाळे (दोन सायकल), ग्रामपंचायत सदस्य संजय शिरतोडे (एक सायकल), यशवंतराव चव्हाण शॉपिंग सेंटर भिशी ग्रुप (एक सायकल) यांच्याद्वारे सायकली देण्याचे जाहीर करण्यात आले.