उत्तर महाराष्ट्रक्राइमताज्या बातम्याधुळेपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

भोंदूगिरी करणारी टोळी गजाआड : अपत्य प्राप्तीचे अमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा

कराड तालुक्यातील प्रकार, परजिल्ह्यातील चाैघांवर गुन्हा

कराड | वैद्यकीय व्यवसायाची कोणतीही पदवी नसताना अपत्य प्राप्तीचे अमिष दाखवून लाखो रूपयांचा गंडा घातल्याची तक्रार तळबीड पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. लोकांची फसवणूक करणाऱ्या आणि अपत्य प्राप्तीसाठी औषधे देणारी परजिल्ह्यातील भोंदूगिरी करणाऱ्या टोळीला तळबीड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी नारायण वाघ वैद्य खरे नांव राहुल धरमगिरी गोसावी (वय- 32, व्यवसाय व्यापार, रा. तिरंगानगर साक्री ता. साक्री, जि.धुळे) व त्याचे बरोबर असणारे साथीदार 1) अश्विन अशोक गोसावी (वय- 34, व्यवसाय नोकरी, रा. गोसावीवस्ती वैद्यवाडी-हडपसर पुणे), मुळ गांव वाकोत ता. जामनेर जि.जळगांव) 2) शैलेश सुरेश गोसावी (वय- 22, व्यवसाय नोकरी, रा तिरंगानगर साक्री ता. साक्री जि.धुळे) 3) दैवेद्र ज्ञानेश्वर पवार (वय- 32, व्यवसाय ड्रायव्हर रा. सुशिलानगर साक्री ता. साक्री जि.धुळे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तळबीड येथील एका दाम्पत्यांस नारायण वाघ वैद्य नावाचे भोंदूगिरी करणाऱ्याकडे कोणती वैद्यकीय व्यवसायाची पदवी नाही. तरीही संबधित दाम्पत्यांस फोन वरून संपर्क साधून त्याना होत नसलेले अपत्य औषधाने होवू शकते ते औषध मोफत देतो असे म्हणाले. त्यापोटी फक्त आमचे मठाची पावती 11 हजार रुपयाची पावती घ्यावी लागेल असे सांगितले. त्यानंतर दांपत्याचा विश्वास संपादन करुन त्याच दिवशी चार लोक टाटा पंच कार नंबर (एम.एच- 18 बी एक्स 4560) या कारने येवून त्या दांपत्यास अपत्या बाबत औषध देतो. परंतू ती औषध महाग आहेत, तुमची तुम्ही आणा असे सांगून नंतर वेळोवेळी त्याना त्याचे जवळची व शाही एजन्सी आयुर्वेदीक मेडीकल सातारा येथून 1 लाख 76 हजार 500 रुपयाचे औषधे दिली. नंतर दि. 14/8/2023 रोजी परत तळबीड येथे येवून त्या दांपत्याची मेडीकल मधील किटने टेस्ट करुन सदर महिला गरोदर असल्याचे सांगितले. त्यानी सदरची टेस्ट कोणत्याही डॉक्टर कडून करु घेवून नये, नाहीतर ती टेस्ट निगेटीव्ह येईल असे सांगितले. पुन्हा त्यांना 2 लाख 60 हजार रुपयाची औषधे घ्या असे सांगितले.

तेव्हा सदर दापत्यास त्याचा संशय आल्याने औषधासाठी पैसे नाहीत पैसे जमले की सांगतो असे सांगितले. त्यानंतर ती टोळी त्याना औषध घेणे करीता वारंवार फोन करीत होती. संबधित दाम्पत्यांने कराड येथील डॉक्टर याचेकडे नियमीत टेस्ट आणि सोनाग्राफी केली असता ती गरोदर नसल्याचे समजल्याने त्याची फसवणूक केल्याचे लक्षात आले. तेव्हा तळबीड पोलीस ठाणेत सदर टोळीविरूध्द तळबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, तळबीड पोलीस ठाणेचे पोहेकॉ आप्पा ओंबासे, पोना/ योगेश भोसले, पोकॉ/ निलेश विभुते, पोकों/ प्रविण गायकवाड, पोकों / अभय मोरे पो. कॉ.प्रविण फडतरे यांनी केली आहे. गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक आर. आर. वरोटे हे करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker