भाजपने ओबीसी समाजाचे आरक्षण घालवले : आ. पृथ्वीराज चव्हाण
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
राज्यातील भाजप सरकारने एकही प्रश्न सोडवला नाही. तीन वर्षात सात राज्यात विविध प्रकारची भीती दाखवून इतर पक्षांचे सरकार पाडण्याचे पाप भाजपने केले आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण घालवले असा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. चिखली (ता. कराड) येथे राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल कराड उत्तर विभागाच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी होते. काँग्रेसचे प्रांतिक सदस्य अजितराव पाटील- चिखलीकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नंदकुमार कुंभार, कराड उत्तर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवासराव थोरात, महानंदाचे संचालक वसंतराव जगदाळे, कोयना दूध संघाचे माजी चेअरमन संपतराव इंगवले, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार, रयत संघटना मार्गदर्शक प्रा. धनाजी काटकर, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष आशिष कोरे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, अविनाश नलवडे, सुदाम दीक्षित, राजेंद्र पाटील, सतीश इंगवले, उमेश साळुंखे, रवी बडेकर, शैलेश चव्हाण उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलच्या उपाध्यक्षपदी प्रवीण जांभळे यांची निवड झाल्याबद्दल आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रामचंद्र सावंत यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंतापदी, कु. धैर्यशीला सावंत हिची महाराष्ट्र शासन महाडाच्या डेप्युटी इंजिनियरपदी, संजय साळुंखे यांची जिल्हा सहकार बोर्डाच्या अध्यक्षपदी, शिवाजीराव गावडे यांची कोयना दूध संघाच्या संचालकपदी, सोहम जांभळे मंथन परीक्षेत सातारा केंद्रात प्रथम आल्याबद्दल व रवी बडेकर यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रवीण जांभळे यांनी केले. सूत्रसंचालन गोरख पाटील यांनी केले. विठ्ठल मोरे यांनी आभार मानले.
बॅंक खात्यावरील दोन हजार रूपयाला भुलू नका : अजितराव पाटील
बँक खात्यावर दोन हजार रुपये आले म्हणून जनतेने भुलू नये. घरगुती सिलिंडर, युरिया, पेट्रोल याचे दर कुठे गगनाला भिडलेत ते बघा. भाजपाने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. यापुढे सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून केवळ काँग्रेस पक्षाकडेच पाहिल्याशिवाय पर्याय नाही. अशी स्पष्टोती अजितराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत केली.