Satara News : दरोड्यासह अपहरण करणाऱ्या 19 वर्षीय 4 आरोपी युवकांना 24 तासात अटक
सातारा | साताऱ्यातील हॉटेल नेशन 11 विसावा नाका व आणासाहेब कल्याणी हायस्कूल मार्गावर दोघांना 8 जणांनी मारहाण करून त्याचे अपहरण करत मोटार सायकल घेवून पळून गेले होते. याप्रकरणी 1) शंतनु रामचंद्र पवार (वय- 19), 2) ॠषिकेश गणेश त्रिगुणी (वय- 19), 3)साहिल सतिश नलावडे (वय- 19), 4)क्षितिज संतोष पवार (वय- 19,
सर्व रा. मंगळवार पेठ- सातारा) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, हॉटेल नेशन 11 विसावा नाका व आणासाहेब कल्याणी हायस्कूल मार्गावर 8 इसमांनी फिर्यादी यास “तु आमची खुन्नस काढतो का? तु आमच्या साथीदाराला मारतोस काय? असे म्हणुन त्यातील एकाने फिर्यादी याचे डोक्यात घातक हत्याराने वार केला. तसेच इतरांनी पट्ट्याने व लाकडी दांडक्याने फिर्यादी व त्याच्या मित्रास मारहाण केल्याची घटना घडली होती. यावेळी फिर्यादी यास मोटार सायकलवरुन कुरणेश्वर- जकातवाडी (ता. सातारा) येथे पळवून नेऊन त्याच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढुन घेवून पळून गेले होते. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सातारा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने या गुन्ह्यातील आरोपी यांची गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती काढुन सातारा शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावले. या गुन्ह्यातील 4 आरोपी व एका विधी संघर्षग्रस्त बालकास सातारा शहर परिसरातून ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, लैलेश फडतरे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, मोहन पवार, विक्रम पिसाळ, ओंकार यादव, स्वप्निल कुंभार, अमित माने, अरुण पाटील, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे यांनी सदरची कारवाई केली आहे.