विजयनगर येथे रविवारी ‘रन फॉर SB मॅरेथॉन- 2023’ या स्पर्धेचे आयोजन
स्पर्धकांना टी- शर्ट आणि फिनिश मेडल मिळणार

कराड | कराड तालुक्यातील युवा नेते व उद्योजक सुनील बामणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सुनील बामणे मित्रपरिवार यांच्यावतीने रविवारी (दि. 10 सप्टेंबर 2023) रोजी ‘रन फॉर एस. बी. मॅरेथॉन 2023’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या मॅरेथाॅनचे उदघाटन कराडचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सुनील बामणे मित्र परिवाराच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, रविवार दि. 10 सप्टेंबर रोजी सातारा जिल्हा ॲमॅच्युअर अॅथलेटिक असोसिएशन यांच्या मान्यतेने भव्य-दिव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न होणार आहे. रविवारी सकाळी 6 वाजता आंतरराष्ट्रीय धावपटू कैलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी सहा वाजता विजयनगर येथील एमएसईबी चौकातून या मॅरेथॉन स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. यामध्ये 12 वर्षाखालील मुले व मुली (प्रवेश फी- 100) – अंतर 2 किमी, 12 ते 14 वयोगट मुले व मुली (प्रवेश फी- 200) अंतर 5 किमी, 14 ते 18 वयोगट मुली व मुली (प्रवेश फी- 200) – अंतर 8 किमी, 18 ते 35 वयोगट मुले व मुली (प्रवेश फी- 300) अंतर 10 किमी, 35 वर्षांवरील पुरुष व महिला ( प्रवेश फी- 300) – अंतर 5 किमी व 45 वर्षांवरील महिला व 50 वर्षांवरील पुरुष (प्रवेश फी- 300) – अंतर 5 किमी असणार आहे.
पहिल्या चार वयोगटांसाठी प्रथम तीन क्रमांकांसाठी रोख रक्कम, तर उर्वरित दोन वयोगटांसाठी सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी दत्त चौकातील भट्टड कॉम्प्लेक्समध्ये नाव नोंदणी सुरु असून जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच इच्छुक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवावा. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन सुनील बामणे मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.