गणेशोत्सव व ईद- ए- मिलाद काळात नियमभंग झाल्यास कठोर कारवाई होणारच : विठ्ठल शेलार

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळांनी समाज प्रबोधनावर भर द्यावा. सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम राबवावेत. गणेशोत्सव काळात स्पीकर व डीजेच्या आवाजाची पातळी समप्रमाणात ठेवावी. हुल्लडबाजी व नियमभंग झाल्यास कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी मसूरला सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिला. पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांनीही यावेळी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच वेळी येत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव आनंदात उत्साहात साजरा करावा. मंडप उभारताना वाहतुकीस कुठलीही अडचण येणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. प्रथमता मंडळांनी रितसर परवानगी घ्यावी. वर्गणीची जबरदस्ती करणे, यासंदर्भात तक्रार आल्यास कारवाई केली जाईल. एखादी चूक झाल्यास संपूर्ण आयुष्यभर ती भोगावी लागते. मुख्यःता मिरवणुकीत मद्यपान टाळावे. देखावे सादर करताना सामाजिक, धार्मिक व समाज प्रबोधनपर उपक्रमावर भर द्यावा. विडंबनात्मक, सामाजिक तेढ निर्माण करणारे देखावे सादर करू नयेत. मिरवणूक काळात मंडळांनी पुढे जाण्यास एकमेकास सहकार्य करावे. मूर्तींची विटंबना व वादविवाद होणार नाहीत. या संदर्भात खबरदारी घ्यावी. मंडपाच्या ठिकाणी शॉर्टसर्किट होणार नाही. याबाबतची काळजी महत्त्वपूर्ण आहे. मंडपात रात्रीच्यावेळी कार्यकर्त्यांचा मुक्काम असावयास हवा.
पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांनी प्रथमःता सार्वजनिक मंडळांनी रितसर परवानगी घ्यावी. परवानगीसाठी पोलीस पाटील सहकार्य करतील. मंडपात व मिरवणूक काळात आवाजाची पातळी समप्रमाणात ठेवावी. शासकीय व सातारा पोलीस दलाच्या नियमांचा भंग गणेशोत्सव काळात करू नये. अन्यथा कठोर कारवाई केली जाणार आहे. भविष्यात कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही याची जबाबदारी स्वतः कार्यकर्त्यांनीच घ्यायला पाहिजे. बैठकीस मसूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.