ताज्या बातम्याधार्मिकपश्चिम महाराष्ट्रराज्यसातारासामाजिक

कराडच्या प्रीतिसंगमावर गणेशभक्तांसाठी सलग ९ व्या वर्षी श्रमपरिहार : अनंत चतुर्दशीला रणजितनाना पाटील मित्र परिवाराचा उपक्रम

गेल्या वर्षी 40 हजार जणांना महाप्रसाद वाटप

कराड | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व सामाजिक कार्यकर्ते रणजित (नाना) पाटील व मित्रपरिवाराच्या वतीने सलग नवव्या वर्षी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनासाठी प्रीतिसंगमावर येणाऱ्या भाविक व सार्वजनिक मंडळांना श्रमपरिहार (महाप्रसाद) देण्यात येणार आहे. गुरूवारी 28 रोजी सकाळपासून रात्री शेवटचे गणेश विसर्जन होईपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. भाविक व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याचा लाभ घ्यावा असे, आवाहन रणजित (नाना) पाटील यांनी केले आहे.

अनंत चतुर्दशीला शहर व परिसरातील भाविक व सार्वजनिक मंडळे प्रामुख्याने प्रीतिसंगमावर कृष्णा- कोयना नदीच्या संगमावर गणेश विसर्जन करतात. यावेळी विसर्जनासाठी मोठी गर्दी होते. या भाविकांना व कार्यकर्त्यांना श्रमपरिहार म्हणून महाप्रसाद देण्याचा उपक्रम रणजितनाना पाटील यांनी 2015 साली सुरू केला. कृष्णा घाटावर हा उपक्रम राबवण्यात येतो. दरवर्षी सातत्याने हा उपक्रम राबवण्यात येत असून दरवर्षी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो. गेल्या वर्षी सुमारे 40 हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादा बरोबरच भाविकांना पाणी बॉटलही देण्यात येते.

यावर्षी गुरूवारी दि. 28 रोजी अनंत चतुर्दशी असून कृष्णा घाटावर येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसाद व पाणी बॉटल देण्यात येणार आहे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार आदींना या उपक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. तेव्हा भाविक व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे रणजितनाना पाटील यांनी म्हटले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker